खारघर : रामप्रहर वृत्त
रोटरी खारघर मिडटाऊन आणि सीएजतर्फे खारघरच्या मुर्बी गावात, जिल्हा परिषद शाळेचे (मुरबी शाळा) नुतनीकरण करण्याचा कामाचा सुरुवात शुक्रवारी (दि. 4) सकाळी 9.30 वाजता केली.
या वेळी प्रभाग क्र. 4 चे नगरसेवक अभिमन्यू पाटील, शाळेच्या मुख्याध्यापिका वनिता शिर्के, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष एन. बी. पाटील गावातले शाळेचे कमिटी मेंबर्स, रोटरी खारघर मिडटाऊनचे अध्यक्ष कमलेश अगरवाल, रोटरी खारघर चॅरिटेबल ट्रस्टपचे अध्यक्ष शाम फडणीस उपस्थित होते.
शाळेच्या नुतनीकरणाच्या कामासाठी सीएज इन्फोने 16 लाखचे अनुदान दिले आहे. दोन ते तीन महिनात हे नुतनीकरण होईल. त्यामुळे शाळेच्या बर्याच समस्या दूर होऊन विद्यार्थ्यांना सर्वात जास्त फायदा होईल.