Breaking News

रायगडची कोरोनामुक्तीकडे वाटचाल

नऊ तालुक्यांमध्ये एकही रुग्ण नाही

अलिबाग : रामप्रहर वृत्त

रायगड जिल्ह्याची कोरोनामुक्तीकडे वाटचाल सुरू आहे. जिल्ह्यातील 15 पैकी नऊ तालुक्यांत कोरोनाचा एकही रुग्ण आढळला नाही, तर पाच तालुक्यांमध्ये प्रत्येकी एकच रुग्ण आढळला.

रायगड जिल्ह्यात 8 मार्च 2020 रोजी कोरोनाचा पहिला रुग्ण सापडला होता. त्यानंतर सण, उत्सव व समारं भाच्या निमित्ताने नागरिक एकमेकांच्या संपर्कात आल्याने कोरोना रुग्णांची संख्या वाढली होती. गेल्या वर्षी जुलै आणि सप्टेंबर महिन्यामध्ये कोरोना रुग्णांत लक्षणीय वाढ झाल्याने सरकार आणि प्रशासनही जागे झाले. त्यांनी कोरोनाविषयक जनजागृतीवर भर दिला तसेच मास्क, सॅनिटाययझरचा वापर आणि सामाजिक अंतर राखण्याचे नियम कडक केले. जिल्हाबंदी करताना तसेच गावात प्रवेश करताना कोरोनाची टेस्ट अनिवार्य केली. त्यामुळे रुग्णसंख्या घटण्यास मदत झाली. नागरिकांनीही कोरोनाविषयीचे नियम पाळत आरोग्य व्यवस्थेला मदत केली. नियम पाळल्याने अलिकडे जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या फारच कमी झाली आहे.

सोमवारी मिळालेल्या माहितीनुसरा रायगड जिल्ह्यातील नऊ तालुक्यांमध्ये कोरोनाचा एकही रुग्ण आढळला नाही, तर पाच तालुक्यांमध्ये कोरोनाची रुग्णसंख्या एक अंकी झाली आहे. मात्र कधीकधी एकही रुग्ण नसणार्‍या तालुक्यात अचानक रुग्ण सापडत असल्याने प्रशासनाने  नागरिकांना कोरोनाचे नियम पाळण्याचे आवाहन केले आहे.

Check Also

नवीन पनवेल येथे भीम जयंती महोत्सव; गायक आनंद शिंदे यांचा बहारदार कार्यक्रम

आमदार प्रशांत ठाकूर यांची उपस्थिती पनवेल : रामप्रहर वृत्तमहामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५व्या जयंतीचे …

Leave a Reply