Breaking News

उरण केगावातील तरुणांचा भाजपमध्ये प्रवेश

उरण : वार्ताहर

माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, भाजप उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेऊन उरण तालुक्यातील केगाव गावातील अनेक तरुणांनी तसेच केगाव ग्रामपंचायतमधील माजी उपसरपंच विलास काठे, अरविंद पवार यांनी रविवारी (दि. 13) उरण भाजप कार्यालयात आमदार महेश बालदी यांच्या उपस्थित भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. या वेळी आमदार बालदी यांनी सर्वांचे स्वागत करून, अभिनंदन केले व पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

या वेळी नगरपरिषद उपनगराध्यक्ष जयविन्द्र कोळी, भाजप तालुका अध्यक्ष तथा नगरसेवक रवी भोईर, शहर अध्यक्ष तथा नगरसेवक कौशिक शाह, नगरसेवक राजेश ठाकूर, हितेश शाह, विनोद दानी, माजी नगरसेवक राजेश कोळी, मदन कोळी, जसिम गॅस, मनोहर सहतीया, मनन पटेल, मकरंद पोतदार, सुरज ठवळे, केगाव भाजप विभाग प्रमुख तथा केगाव माजी उपसरपंच विलास काठे, केगाव भाजप अध्यक्ष निलेश घरत, केगावचे माजी उपसरपंच अरविंद पवार, केगाव उपाध्यक्ष गणेश पाटील, सचिव दर्णे, युवा अध्यक्ष मिथुन पुरव, युवा सचिव विराज म्हात्रे, खजिनदार विनेश पाटील, सेक्रेटरी विनेश पाटील, राजेंद्र म्हात्रे, महेंद्र म्हात्रे, विवेक दर्णे व केगाव येथील भाजप कार्यकर्ते उपस्थित होते.

केगाव गावातील प्रेरणा पाटील, अतिष हुजरे, जयप्रकाश हुजरे, हितेश पाटील, प्रवीण पाटील, मयूर हुजरे, शेखर काठे, मेहबूब शेख, दिपेश कनोजिया, गणेश कामत, चेतन पाटील, हनुमान वर्मा, प्रकाश पाटील, रोशन पाटील, प्रवीण पाटील आदींनी भाजपमध्ये  जाहीर प्रवेश केला.

Check Also

उलवे नोडमध्ये रविवारी महासंस्कृती : जागर स्त्री शक्तीचा सांस्कृतिक कार्यक्रम

भजनी मंडळांना भांडवली अनुदानाचे होणार वाटप पनवेल : रामप्रहर वृत्तमहाराष्ट्र शासनाचा सांस्कृतिक कार्य विभाग आणि …

Leave a Reply