Breaking News

कर्जतमध्ये भाजपचा मेळावा; आगामी निवडणुकांची पूर्वतयारी; कार्यकर्त्यांना मार्गदर्शन

कर्जत ः बातमीदार

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाच्या वतीने कर्जत मंडल बूथ अध्यक्ष आणि शक्तीकेंद्र प्रमुख यांच्या मेळाव्याचे आयोजन शुक्रवारी (दि. 22) किरवली येथील साईकृपा शेळके मंगल कार्यालयात करण्यात आले होते. या वेळी माजी पालकमंत्री तथा भाजप प्रदेश सरचिटणीस आमदार रवींद्र चव्हाण, कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार निरंजन डावखरे यांची प्रमुख उपस्थिती लाभली. आमदार निरंजन डावखरे यांनी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील सरकारने सर्वसामान्य माणसाचा विचार करून अनेक योजना दिल्या आहेत. महिला भगिनींना उज्ज्वला योजनेंतर्गत मोफत गॅस कनेक्शन, मुद्रा योजनेतून होतकरू तरुणांना व्यवसायासाठी कर्जाची उपलब्धता, गरीब कल्याण योजनेंतर्गत सर्वसामान्य जनतेला धान्यवाटप, प्रधानमंत्री आवास योजनेतून गोरगरिबांना घरे देणे, किसान सन्मान योजनेतून शेतकर्‍यांना दोन हजार रुपयांच्या तीन हप्त्यांत सहा हजार रुपये रक्कम डीबीटीच्या माध्यमातून देणे यांसारख्या अनेक योजना मोदी सरकारच्या माध्यमातून राबविल्या गेल्या. त्याचप्रमाणे कोरोना काळात मोफत लस दिली जात आहे. या सर्व योजना घेऊन भाजप कार्यकर्त्यांनी सर्वसामान्य नागरिकांपर्यंत गेले पाहिजे. या मेळाव्याला भाजपचे कर्जत तालुकाध्यक्ष मंगेश म्हसकर, अनुसूचित जाती मोर्चा जिल्हाध्यक्ष व पनवेलचे नगरसेवक प्रकाश बिनेदार, जि. प. सदस्य अमित जाधव, जिल्हा संघटन सरचिटणीस अविनाश कोळी, जिल्हा सरचिटणीस दीपक बेहरे, राजेश भगत, चिटणीस रमेश मुंढे, नितीन कांदळगावकर, सुनील गोगटे, संजय कराळे, किरण ठाकरे, कर्जतचे उपनगराध्यक्ष अशोक ओसवाल, माथेरानचे उपनगराध्यक्ष आकाश चौधरी, नगरसेवक बळवंत घुमरे, नगरसेविका स्वामिनी मांजरे, माथेरान अध्यक्ष प्रवीण सकपाळ, महिला मोर्चा तालुका अध्यक्ष स्नेहल गोगटे, नेरळ शहराध्यक्ष नम्रता कांदळगावकर, संतोष भोईर, प्रमोद पाटील, केशव तरे, रोशन पाटील, राहुल कुलकर्णी, राजन लोभी, प्रकाश पेमारे, संभाजी गरूड, संतोष शिंगाडे, नरेंद्र कारले, धनंजय धुळे, राहुल मुकणे, बिनीता घुमरे, मृणाल खेडेकर, श्रद्धा कराळे, सुप्रिया भगत, सरिता पादीर यांच्यासह तालुक्यातील 200 बूथ अध्यक्ष आणि 50 शक्तीकेंद्र प्रमुख उपस्थित होते.

राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश

या वेळी आमदार निरंजन डावखरे यांच्या उपस्थितीत नेरळ मोहाचीवाडी येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते अनिल मिरकुटे, राजेंद्र वाघमारे, रवींद्र जाधव, विजय जाधव, प्रकाश मिरकुटे, सुनील वाघमारे, अजय वळवी, राजेश मुकणे, मंगेश वाघमारे, नितीन मिरकुटे, अभिषेक वाघमारे, लक्ष्मण मुरकुटे, ऋतिक हिलम, करण वाघमारे, विनोद कातकरी, कैलास मुकणे, अंकुश वळवी, हरेश वाघमारे, बाळ वारे, राजीक खान, प्रतीक बांगर, गणेश पवार, स्वप्नील वळवे, सुनील वाघ, आकाश वळवी यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. पक्षाची शाल देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले.

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत शत प्रतिशत भाजप हा मंत्र घेऊन आपण जनतेसमोर जाऊ आणि भारतीय जनता पक्षाचे जास्तीत जास्त सदस्य निवडून आणू. -आमदार रवींद्र चव्हाण, माजी मंत्री

Check Also

भाजप नेते अरुणशेठ भगत यांच्या हस्ते वाजे येथे रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल तालुक्यातील वाजे येथे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या ग्रामविकास निधीमधून नव्याने बांधण्यात …

Leave a Reply