Breaking News

शिवद्रोही आमदार प्रताप सरनाईकांनी माफी मागावी; अन्यथा तीव्र आंदोलन

उमरठ येथील तानाजी मालुसरे ट्रस्टचा इशारा

पोलादपूर : प्रतिनिधी – स्वराज्यासाठी आपल्या जीवाची बाजी लावणारे नरवीर तानाजी मालुसरे यांच्याविषयी अवमानजनक वक्तव्य करणारे शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांचा सर्वस्तरांतून निषेध होत आहे. आमदार सरनाईक यांनी चुकीच्या विधानाबद्दल उमरठ वा सिंहगडला नतमस्तक होऊन माफी मागावी; अन्यथा सर्वत्र तीव्र आंदोलनाची भूमिका घेतली जाईल, असा इशारा उमरठ येथील तानाजी मालुसरे उत्सज्ञा समिती चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष तथा शिवसेनेचे रायगड जिल्हा परिषद सदस्य चंद्रकांत कळंबे यांनी दिला आहे.

‘नरवीर तानाजी मालुसरेंसारखा धारातीर्थी पडणारा मी सोळाव्या शतकातील मावळा नाही, तर आमदार प्रताप सरनाईक 21व्या शतकातील मावळा असून, धारातीर्थी पडणारा नाही’, असे बेताल वक्तव्य आमदार प्रताप सरनाईक यांनी करून तमाम नरवीरप्रेमींच्या भावना दुखावल्या आहेत. याचा नरवीरभूमी उमरठ येथे जाहीर निषेध करण्यात आला, तसेच माफी मागण्यासाठी आमदार सरनाईकांना आठवडाभराची मुदत देण्यात आली आहे.

या निषेधा वेळी कळंबे यांच्यासह उत्सव समितीचे उपाध्यक्ष शिवराम मालुसरे, जयराम मोरे, रामदास कळंबे, अनिल ज्ञानोबा मालुसरे, सरपंच चंद्रकांत कळंबे, पारमाचीचे सरपंच अनिल मालुसरे, इंद्रजित कळंबे, उमरठचे पोलीस पाटील गणेश कळंबे, कियेचे पोलीस पाटील सुनील मालुसरे तसेच उमरठ, साखर, किये, पारमाची, शिवथर परिसरातील मालुसरे परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता. उपस्थितांनी आमदार सरनाईक यांच्या निषेधाच्या घोषणा दिल्या.

Check Also

पोषण आहारात मृत उंदीर सापडल्याच्या घटनेतील तपासणीचे नमुने नाकारणार्‍या प्रयोगशाळांवर कारवाई करणार

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रश्नावर ना.आदिती तटकरेंचे उत्तर पनवेल : रामप्रहर वृत्ततपासणीसाठी पाठवलेले नमुने नाकारणार्‍या …

Leave a Reply