मेकिंग द डिफरन्स संस्थेचा उपक्रम
पेण : प्रतिनिधी
मेकिंग द डिफरन्स या संस्थेचे कार्य महाराष्ट्रात सुरू असून लॉकडाऊन व चक्रीवादळ या संकटामुळे मूर्तिकार व कामगार यांचे नुकसान झाले. त्यांना मदत करताना वेगळेच समाधान मिळत आहे. संस्थेतर्फे यापुढेही या परिसरात अशीच मदत केली जाईल, असे प्रतिपादन संस्थेचे अध्यक्ष दीपक विश्वकर्मा यांनी जोहे येथे केले.
अशोक थोरवे व नरेश मोकल यांच्या प्रयत्नाने मेकिंग द डिफरन्स या संस्थेतर्फे जोहे (ता. पेण) येथील गणपती मूर्तीकार, कारखान्यातील कामगारांसह निराधार महिला, अपंग व्यक्ती, टेम्पो चालक व गरजू व्यक्तींना दोन महिने पुरेल एवढे धान्य वाटप करण्यात आले. त्यावेळी झालेल्या कार्यक्रमात दीपक विश्वकर्मा बोलत होते.
द मेकिंग डिफरन्स संस्थेचे हितेश प्रजापती, नरेश मोकल, महाराष्ट्र गणपती मूर्तिकार संघटनेचे अध्यक्ष अभय म्हात्रे, गोपीनाथ मोकल, नारायण म्हात्रे, सुदर्शन मोकल, रवी मोकल, नितीन मोकल, द्विती मेहता, संदीप विश्वकर्मा, रितेश विश्वकर्मा, गीता मेहता, जागृती गुप्ता, मयुरी प्रजापती, सुनीता भारती, अशोक थोरवे, आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.