Breaking News

पीओपीच्या वापराबाबत अभ्यास गट

केंद्रीय पर्यावरणमंत्र्यांची शिष्टमंडळाला ग्वाही

पेण : प्रतिनिधी – पर्यावरणाचे रक्षण झाले पाहिजे आणि गणेश, दुर्गा मूर्ती कारखानदार, मूर्तिकार, कारागीरही जगले पाहिजेत. म्हणून प्लॅस्टर ऑफ पॅरिस (पीओपी)च्या मूर्तीबाबत अभ्यास करून तोडगा काढण्यासाठी अभ्यास गट नियुक्त करण्याची ग्वाही केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी नुकतीच महाराष्ट्रातील मूर्तिकारांना दिली.

केंद्र सरकारने पीओपी वापरावर बंदी आणली आहे. यंदा कोरोनामुळे एक वर्षासाठी पीओपीवरील बंदी शिथिल करण्यात आली होती. आता पुढील वर्षी काय होणार यावरून मूर्तिकार, कारखानदार चिंतेत आहेत. त्यामुळे त्यांच्या शिष्टमंडळाला घेऊन भाजप नेते आमदार अ‍ॅड. आशिष शेलार यांनी केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांची मुंबईत भेट घेतली.

नव्या तंत्रज्ञानानुसार पीओपीची मूर्ती विरघळवता येते. त्याचा वापर करून पर्यावरणपूरक पीओपीची मूर्ती घडविता येते. त्यामुळे याबाबत अभ्यास गट स्थापन करून मार्ग काढता येऊ शकतो ते पाहिले जाईल, असे जावडेकर यांनी सांगितले.

दरम्यान, पेण तालुक्यातील मूर्तिकारही संघटनेच्या वतीने भाजपचे नेते आमदार आशिष शेलार यांच्या मार्फत पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांची भेट घेऊन उदरनिर्वाहाचा प्रश्न मांडणार आहेत, अशी माहिती पेण मूर्तिकार संघटनेचे कृणाल पाटील यांनी सांगितले.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply