Breaking News

`उधार’राजाचे जाहीर आभार

उद्धव ठाकरेंना फडणवीसांचा टोला

नागपूर : प्रतिनिधी
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी नागपुरात दाखल होत गोसेखुर्द प्रकल्पाच्या निर्मितीपासून आजपर्यंत झालेले काम तसेच या प्रकल्पामुळे विकसित होणारी सिंचनक्षमता याबाबतची संपूर्ण माहिती घेतली. मुख्यमंत्र्यांच्या या दौर्‍याबाबत बोलताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरेंना टोला लगावला.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या या दौर्‍याबाबत फडणवीसांनी ट्विट केले. ‘मा. मुख्यमंत्री यांचा अधिवेशन वगळता 14 महिन्यांतील आज पहिला नागपूर दौरा. या दौर्‍यापूर्वी कालच शेतकर्‍यांच्या अंतिम मदतीचा जीआर जारी करण्यात आला. पूर्व विदर्भातील सहा जिल्ह्यातील सर्व नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना प्रचंड अशी 11 कोटी रुपयांची मदत त्यांनी जाहीर केली. ‘उधार‘राजाचे जाहीर आभार!,’ असा टोला त्यांनी लगावला.
याआधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जेव्हा सोलापूरला पहाणी दौर्‍यासाठी गेले, तेव्हा त्यांच्या हस्ते तीन हजार रुपयांच्या चेकचे वाटप करण्यात आले होते. त्याबाबत बोलताना फडणवीस म्हणाले होते की मुख्यमंत्रिपदी असलेली व्यक्ती जेव्हा अशा ठिकाणी जाते तेव्हा त्यांच्या हस्ते किती मदत द्यावी याचा काहीतरी राजशिष्टाचार ठरवण्यात आला पाहिजे. कारण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अवघ्या तीन-तीन हजारांचे चेक नुकसानभरपाई म्हणून देणे योग्य नाही. अशा प्रकारची मदत देणे म्हणजे ‘राजा उदार झाला अन् हाती भोपळा दिला’ याच म्हणीप्रमाणे आहे. त्याच उक्तीचा आधार घेत त्यांनी शुक्रवारी मुख्यमंत्री ठाकरेंना टोला लगावला.

Check Also

उलवे पोलीस ठाण्याचे शानदार उद्घाटन

परिसरातील नागरिकांना न्याय मिळेल -आमदार महेश बालदी उलवे नोड ः रामप्रहर वृत्त आमदार महेश बालदी …

Leave a Reply