पोलादपूर : प्रतिनिधी
तालुक्यातील लहुळसे गावात असलेल्या एका सामायिक घराच्या इमारतीवर गुरुवारी (दि. 7) सायंकाळी मुसळधार पावसादरम्यान वीज पडली. त्यामुळे आग लागून हे घर भस्मसात झाले. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
लहुळसे गावातील शिवराम गणपत रिंगे यांच्या वडिलोपार्जित घरावर गुरुवारी रात्री सुमारे आठ वाजण्याच्या सुमारास वीज पडली. वीज कोसळण्यादरम्यान घरात शॉर्टसर्किट झाल्याने ही आग अधिकच भडकली. शिवराम रिंगे व त्यांची पत्नी वेळीच घराबाहेर पडल्याने बचावले. ग्रामस्थ आणि महाड एमआयडीसीतील अग्निशमन यंत्रणेने आग विझविली, मात्र तोपर्यंत चार खोल्यांचे घर आतील चीजवस्तूंसह जळून खाक झाले होते. झालेल्या नुकसानीचा पंचनामा करून संबंधितांचे जाबजबाब घेण्यात आले आहेत.
Check Also
तळोजा मजकूरमध्ये शिवरायांच्या मंदिराचा वर्धापन दिन
तळोजा : रामप्रहर वृत्ततळोजा मजकूर येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज मंदिराचा पहिला वर्धापन दिन रविवारी …