Breaking News

कबड्डी स्पर्धेत वावळोली, चिवे संघांची चमक

पाली : प्रतिनिधी

सुधागड तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत वावळोली व चिवे येथील आदिवासी आश्रमशाळांच्या संघांनी दिमाखदार कामगिरी केली. नांदगाव येथील संत नामदेव माध्यमिक विद्यालयाच्या मैदानावर ही स्पर्धा झाली.

या स्पर्धेत वावळोली शाळेच्या मुलांनी 19 वर्षे वयोगटात प्रथम क्रमांक, 17 वर्षे गटात मुलींनी प्रथम क्रमांक आणि मुलांनी द्वितीय क्रमांक प्राप्त केला. विजयी संघांचे आणि व्यवस्थापक व प्रशिक्षक गणेश चोरगे, विजय काटकर, संतोष पाटील, सायली जांबेकर यांचे शाळेचे मुख्याध्यापक सरिता सावंत, इंगळे, तसेच संस्थेचे अध्यक्ष रवींद्र लिमये यांनी कौतुक केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

या स्पर्धेत चिवे येथील अनुदानित आश्रमशाळेच्या मुलांनी 17 व 14 वर्षे वयोगटात, तर मुलींनी 14 वर्षे गटात द्वितीय क्रमांक प्राप्त केला. यजमान संत नामदेव माध्यमिक विद्यालयातील मुलींनी 14 वर्षे वयोगटात प्रथम क्रमांक, 17 वर्षे गटात द्वितीय, तर मुलांनी 17 वर्षे गटात द्वितीय क्रमांक मिळविला. पाली येथील ग. बा. वडेर हायस्कूल आणि व. ग. ओसवाल कनिष्ठ महाविद्यालयाच्या मुलींनी 19 वर्षे गटात प्रथम, तर मुलांनी 14 वर्षे गटात द्वितीय क्रमांक मिळविला.

या स्पर्धेचे बक्षीस वितरण नांदगाव विद्यालयाचे मुख्याध्यापक बळीराम निंबाळकर, शिक्षक संभाजी ढोपे आदींच्या हस्ते करण्यात आले.

Check Also

पर्यावरण असंतुलनामुळे द्रोणागिरी डोंगराला धोका

संरक्षणासाठी ठोस पावले उचला; आमदार महेश बालदी यांची ‌‘लक्षवेधी‌’ पनवेल : रामप्रहर वृत्तउरणमधील ऐतिहासिक आणि …

Leave a Reply