पनवेल ः रामप्रहर वृत्त
अगामी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्शवभूमीवर उरण विधानसभा मतदारसंघातील मतदार याद्या शुद्धीकरण करण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या कार्यक्रमाचा भाग म्हणून 190 उरण विधानसभा मतदार याद्यांबाबत मोहीम राबविण्यात येत आहे. यासाठी तरुण नागरिक महिला दिव्यांग, नागरिक आपली मतदार म्हणून नोंदणी या मोहिमेतून करून घेऊ शकतो, तरी सर्व मतदारांनी या विशेष मोहिमेचा लाभ घ्यावा, असे आवाहन मतदार नोंदणी अधिकारी, 190 उरण विधानसभा मतदारसंघ तथा उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) मेट्रो सेंटर क्रमांक 3 पनवेल यांनी केले आहे. निवडणूक विभागाकडून मतदार याद्यांचे शुद्धीकरण करण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. त्याचबरोबर यापूर्वी राबविलेल्या मोहिमेत मयत आणि दुबार मतदारांची नावे वगळण्यात आली, तर दुसरीकडे नवीन मतदारांची नावे नोंदविण्यात आल्यामुळे मतदार यादीतील नावांची घट झालेली आहे. निवडणूक निर्णय आयोग यांच्या निर्देशानुसार आगामी विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 मध्ये विचारत घेता 1 जानेवारी 2019 या अर्हता दिनांकावर आधारित विशेष पुनरिक्षण मोहीम राबविण्याचे घोषित केले आहे. त्यानुसार दुसरी विशेष पुर्नरिक्षण कार्यक्रम 15 जुलै 2019 पासून 30 जुलै 2019 या दरम्यान राबविण्यात येत आहे. या काळामध्ये 20, 21, 27, 28 जुलै या दिवशी मतदार नोंदणी विशेष मोहीम राबविण्याचे निर्देश मुख्य निवडणूक अधिकारी यांनी दिलेले आहेत. त्यानुसार 190 उरण विधानसभा मतदारसंघातील उरण, पनवेल, खालापूर या तीन तालुक्यांतील मतदारांनी मतदान केंद्रस्तरीय अधिकार्यांना भेटून मतदार नोंदणी, नावे वगळणे, दुरुस्ती करणे यास प्राधान्य देण्यात येणार आहे. त्याचबरोबर 18, 19 वयोगटातील तरुण, नागरिक, महिला, दिव्यांग यांनी मतदार नोंदणी या विशेष मोहिमेत करू शकतो. उरण विधानसभा मतदारसंघातील नागरिकांनी या मोहिमेचा लाभ घ्यावा, असे आवाहन 190 उरण विधानसभा मतदारसंघ तथा उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) मेट्रो सेंटर क्रमांक 3 पनवेल यांनी केले आहे.