Thursday , March 23 2023
Breaking News

पर्यटक तरुणीचा बुडून मृत्यू ; नेरळ टपालवाडी धबधब्यावरील दुर्घटना; मृतदेह सापडला

कर्जत ः प्रतिनिधी

रायगडमध्ये धबधब्यावर पाय घसरुन पडल्याने पाण्यात बुडून तरुणीचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. नेरळ टपालवाडी धबधबा येथे ही दुर्घटना घडली आहे. संजना शर्मा असे या तरुणीचे नाव असून ती कल्याणची रहिवासी होती. मिळालेल्या माहितीनुसार, संजना आपल्या मित्रांसोबत धबधब्यावर गेली असता ही दुर्घटना घडली. बुधवारी सकाळी ही दुर्घटना घडली होती. गुरुवारी (दि. 11) सकाळी तिचा मृतदेह सापडला असून शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. दरम्यान, बंदी असतानाही याठिकाणी पर्यटक येत आहेत.

याआधी मुंबईतील ट्रॉम्बे येथून सहलीसाठी आलेल्या तीन तरुणांचा कुंडलिका नदीत बुडून मृत्यू झाला होता. त्यापूर्वी फणसाड धरणात रोह्यातून सहलीसाठी आलेल्या दोन भावंडांचा बुडून मृत्यू झाला होता. वारंवार घडणार्‍या या दुर्घटनांमुळे पर्यटकांच्या सुरक्षेचा मुद्दा प्रकर्षांने पुढे आला आहे. सुरक्षित वर्षा सहलींसाठी उपाययोजना करणे आवश्यक आहे, अशी मागणी वारंवार होत आहे.

सहलीसाठी येणारे पर्यटक दुर्घटनांमध्ये दगावण्याचे प्रकार नवे नाहीत. गेल्या दोन वर्षांत 35 हून अधिक पर्यटकांचा बुडून मृत्यू झाला. यात प्रामुख्याने कर्जत, खोपोली, मुरुड आणि माणगाव पावसाळी पर्यटन केंद्रांवर या दुर्घटना घडल्या.

– गोरेगाव येथे गटराच्या मॅनहोलमध्ये दीड वर्षाचा मुलगा बुडून तेरा तास उलटूनही त्याचा शोध न लागल्याने स्थानिकांचा संतापाचा पारा चढला. महापौर विश्वनाथ महाडेश्वर या परिसरात येण्यापूर्वीच स्थानिकांनी गोरेगावमध्ये आंबेडकर चौकात रास्तारोको केला होता. यामुळे काहीकाळ याठिकाणी वाहतूक कोंडी झाली होती. दरम्यान, पवईच्या बांगुर्डा तलावातही एकाचा बुडून मृत्यू झाला.

Check Also

पनवेल महापालिका क्षेत्रामधील नागरिकांना एकूण करात दिलासा द्या

आमदार प्रशांत ठाकूर यांनी सभागृहाचे वेधले लक्ष; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडे आग्रही मागणी पनवेल ः रामप्रहर वृत्त …

Leave a Reply