नवी दिल्ली : क्रिकेटर विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा हे आई-बाबा बनले आहेत. अनुष्काने सोमवारी (दि. 11) दुपारी मुलीला जन्म दिला असून, विराटने ट्विट करीत ही आनंदाची बातमी सर्वांनाना सांगितली.
‘आम्हाला दोघांना हे सांगताना अत्यंत आनंद होत आहे की आज दुपारी आमच्या मुलीचा जन्म झाला. तुमचे प्रेम आणि आशीर्वाद यासाठी आम्ही खूप आभारी आहोत. अनुष्का आणि आमची मुलगी, दोघीसुद्धा ठीक आहेत आणि आमचे हे सौभाग्य आहे की आम्हाला आयुष्यात ही गोष्ट अनुभवता आली. या वेळी आम्हाला थोडी प्रायव्हसी हवी असेल हे तुम्ही नक्कीच समजू शकता असे आम्ही समजतो, अशा आशयाची पोस्ट विराटने शेअर केली आहे.
Check Also
सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर यांना यमुना स्त्री सन्मान पुरस्कार प्रदान
सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील भरीव योगदानाचा गौरव पनवेल ः रामप्रहर वृत्तइतिहासात तसेच आजच्या आधुनिक युगातही अनेक …