Breaking News

ऑस्ट्रेलियाच्या कर्णधाराला दंड

दुबई : वृत्तसंस्था
सिडनी येथे तिसर्‍या कसोटी सामन्यात पंचाशी हुज्जत घातल्याप्रकरणी ऑस्ट्रेलियाचा कर्णधार टीम पेन याला आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) दंड ठोठावला आहे. तिसर्‍या दिवशी पंचाशी हुज्जत घातल्याप्रकरणी दोषी आढळल्यानंतर पेनवर कारवाई करण्यात आली आहे. सामन्याच्या मानधनातून 15 टक्के रक्कम कपात करण्याचा दंड पेनला करण्यात आला आहे.
ऑस्ट्रेलियन कर्णधार टीम पेन आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (आयसीसी) नियम 2.8नुसार आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी दोषी आढळला. त्यामुळे त्याला सामन्याच्या मानधनातून 15 टक्के रक्कम कपात करण्याचा दंड ठोठावण्यात आला आहे. आयसीसीने जारी केलेल्या वक्तव्यात म्हटलेय की, ‘टीम पेन याने नियमाचा भंग केल्याप्रकरणी त्याच्यावर कारवाई करण्यात आली आहे. याशिवाय त्याच्या अनुशासनात्मक रेकॉर्डमध्ये एक ‘डिमेरिट’ अंक जोडण्यात आला आहे. मागील 24 महिन्यांत पेन याची ही पहिलीच चूक आहे.’
नेमके काय घडले?
तिसर्‍या दिवसाच्या खेळात नॅथन लायन गोलंदाजी करीत असताना पुजाराच्या पॅडला लागून चेंडू उडाला आणि तो झेल घेण्यात आला. पुजाराला पंचांनी नाबाद ठरवल्यानंतर लगेचच ऑस्ट्रेलियन कर्णधार टीम पेन याने ‘डीआरएस’ची मदत घेतली. रिव्ह्यूमध्ये चेंडू बॅटला लागला की नाही याबद्दल नीट कळू शकले नाही. त्यामुळे ऑस्ट्रेलियन कर्णधार पेन प्रचंड भडकला व तो मैदानावरील पंच विल्सन यांच्याशी वाद घालू लागला. त्या वेळी पंचांनी त्याला सांगितले की, तिसर्‍या पंचांचा निर्णयच अंतिम असेल. त्यावर उत्तर देताना पेनने पंचांना शिवीगाळ केली होती.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply