सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली मतदारांशी सुसंवाद
पनवेल : रामप्रहर वृत्त : मावळ लोकसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारासाठी पनवेलमधील भाजपचे कार्यकर्ते सक्रिय झाले असून, सोमवारी (दि.15) मनपा सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली महायुतीच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी शहरातील आदित्य सरस्वती, शनि मंदिर, कर्नाळा सर्कल, कर्मवीर भाऊराव पाटील चौक, शिवाजी चौक, भाजप कार्यालय, सिद्धार्थ मार्केट आदी भागांना भेटी देत तेथील मतदारांशी संवाद साधला आणि बारणे यांना मतदान करण्याचे आवाहन केले. या प्रचार रॅलीला उदंड प्रतिसाद लाभला. त्याची चित्रमय झलक.
