Breaking News

क्रिकेटच्या वादातून वढाव येथे मारहाण

पेण ः प्रतिनिधी

वढावं येथे क्रिकेटच्या वादातून मारहाण झाल्याचा प्रकार घडला असून यात एक जण जखमी झाला आहे. वडखळ पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शुक्रवारी वढाव (ता. पेण) हे गावातील मंदिरात दर्शनास गेले असता एकाने तुम्ही देवाच्या अंगणात क्रिकेट खेळताय, येथे लोक देवाच्या दर्शनास येत-जात आहेत, तसेच वर्तमानपत्र देखील वाचत आहेत, मला जसा बॉल लागला तसा इतर लोकांना देखील लागेल, असे बोलले असता सदर गोष्टीचा राग मनात धरून मुलांनी शिवीगाळी करून हाताबुक्क्यांनी मारहाण केली. मंदिराच्या आवारात खेळू नका सांगणार्‍याची पत्नी व मुलगा हे भांडण सोडविण्यास आले असता त्यांनाही खेळणार्‍यांनी हाताबुक्यांनी मारहाण केली. याप्रकरणी वडखळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून, अधिक तपास पोलीस हवालदार म्हात्रे करीत आहेत.

Check Also

सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर यांना यमुना स्त्री सन्मान पुरस्कार प्रदान

सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील भरीव योगदानाचा गौरव पनवेल ः रामप्रहर वृत्तइतिहासात तसेच आजच्या आधुनिक युगातही अनेक …

Leave a Reply