Breaking News

सुकापूर ग्रामपंचायतीचे बिनविरोध सदस्य अशोक पाटील, अनिता पाटील भाजपत दाखल

पनवेल : प्रतिनिधी
पाली देवद (सुकापूर) ग्रामपंचायतीचे बिनविरोध सदस्य अशोक पाटील आणि अनिता आत्माराम पाटील यांनी भाजप उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या उपस्थितीत  सोमवारी (दि. 11) भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. त्यामुळे सुकापूरमध्ये ‘कमळा’चे खाते उघडले. पनवेल तालुक्यात 24 पैकी जास्तीत जास्त ग्रामपंचायती भाजपच्या निवडून येतील, असा विश्वास आमदार प्रशांत ठाकूर यांनी या वेळी व्यक्त केला  
सुकापूर ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत बिनविरोध निवडून आलेले सदस्य अशोक पाटील आणि अनिता आत्माराम पाटील यांनी सोमवारी संध्याकाळी सीकेटी महाविद्यालयात माजी खासदार लोकनेते माजी खासदार रामशेठ ठाकूऱ आणि आमदार प्रशांत ठाकूर यांच्यावर विश्वास ठेवून भाजपमध्ये प्रवेश केला. या कार्यक्रमास भाजप तालुका उपाध्यक्ष संजय पाटील, जिल्हा परिषद सदस्य अमित जाधव, पंचायत समिती सदस्य भूपेंद्र पाटील, महापालिका स्थायी समिती सभापती संतोष शेट्टी, नगरसेवक अ‍ॅड. मनोज भुजबळ, युवा मोर्चा उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष मयुरेश नेतकर, आकुर्लीचे सरपंच सचिन पाटील, सुकापूर गाव अध्यक्ष राजेश पाटील, पाली देवद जि. प. विभागीय अध्यक्ष किशोर सुरते, पंचायत समिती ज्ञानेश्वर पाटील तसेच चंद्रकात पोपेटा, प्रकाश पोपेटा, बुवाशेठ भगत, आळुराम केणी, महेश पाटील, अतिश पाटील, योगेश पाटील, यतिन आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
या वेळी आमदार प्रशांत ठाकूर म्हणाले की, सगळ्यांना उत्सुकता लागलेली आहे की या निवडणुकीच्या माध्यमातून काय होईल, परंतु भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना खात्री आहे की आपण या ग्रामपंचायतीमध्ये सर्वसामान्य नागरिकांसाठी जी कामे केली आहेत त्यामुळे आपल्याला यश मिळणारच. थोड्याशा गैरसमजामुळे  अशोक पाटील आणि अनिता आत्माराम पाटील आमच्यापासून लांब गेले होते. त्यांनाही चुकल्यासारखे वाटत होते. आपल्या जीवाभावाची माणसे आपल्यापासून लांब जाऊ नये म्हणून अस्वस्थ वाटत होते. त्यांनी ही भावना माझ्याजवळ व्यक्त करून परत येण्याची इच्छा व्यक्त केली आणि आज पुन्हा आपल्या पक्षात प्रवेश केला. त्यांचे जल्लोषात स्वागत करू या आणि मधले चार दिवस घडलेच नाही असे समजू या.

Check Also

महिंद्रा शोरूमला लागलेल्या आगीत पाच गाड्या जाळून खाक; लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान

पनवेल: वार्ताहर पनवेल जवळील कोळखे येथील महिंद्राच्या शोरूमला आग लागल्याची भीषण घटना गुरुवारी (दि. 20) …

Leave a Reply