भारताचे शेपूट ऑस्ट्रेलियाला पडले भारी; शार्दुल-वॉशिंग्टनची ‘सुंदर’ खेळी

ब्रिस्बेन : वृत्तसंस्था

चौथ्या व निणार्यक ब्रिस्बेन कसोटीत मराठमोळा शार्दुल ठाकूर आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी सातव्या गड्यासाठी केलेल्या 123 धावांच्या भागिदारीच्या बळावर भारतीय क्रिकेट संघाने पहिल्या डावात 336 धावांपर्यंत मजल मारली आहे. ऑस्ट्रेलियाला पहिल्या डावांत 33 धावांची आघाडी मिळाली असून, तिसर्‍या दिवसाखेर त्यांनी बिनबाद 21 धावा केल्याने एकूण आघाडी 54 धावांवर पोहचली आहे. 186 धावांवर आघाडीचे सहा फलंदाज तंबूर परतल्यानंतर भारतीय संघ 200 धावांपर्यंत मजल मारेल का, अशी शंका अनेकांच्या मनात होती, मात्र पदार्पण करणारा सुंदर आणि दुसरा सामना खेळणार्‍या ठाकूरने जबाबदारीने फलंदाजी करीत भारतीय संघाची धावसंख्या तीनशेपार पोहचवली. ऑस्ट्रेलियाकडून हेजलवूडने सर्वाधिक पाच गडी बाद केले. शार्दुल ठाकूरने 115 चेंडूंचा सामना करताना नऊ चौकार आणि दोन षटकाराच्या मदतीने 67 धावांची, तर सुंदरने 144 चेंडूंचा सामना करताना सात चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने 62 धावांची खेळी केली. सुंदर-शार्दुल या जोडीने ब्रिस्बेनमध्ये सातव्या क्रमांकावरील सर्वांत मोठी भागिदारी केली आहे. तळाच्या पाच फलंदाजांनी 150 धावा जोडत भारतीय संघाची धावसंख्या वाढवली. तिसर्‍या दिवसाच्या खेळाला सुरुवात झाल्यानंतर अनुभवी चेतेश्वर पुजारा (25) आणि कर्णधार अजिंक्य रहाणे (37) झटपट बाद झाले. त्यानंतर आलेल्या ऋषभ पंत (23) आणि मयांक अगरवाल (38) यांनी दुसर्‍या सत्रात धावसंख्या वाढवण्याचा प्रयत्न केला, मात्र पंत आणि मयांकला चांगल्या सुरुवातीनंतरही मोठी धावसंख्या उभारण्यात अपयश आले. ऑस्ट्रेलियाकडून हेजलवूडने सर्वांत प्रभावी मारा करीत पाच बळी टिपले. पॅट कमिन्स आणि मिचेल स्टार्कने प्रत्येकी दोन गडी बाद केले, तर 100वा कसोटी सामना खेळणार्‍या नॅथन लायनला एक विकेट मिळाली. भारतीय संघाचा पहिला डाव 336 धावांवर संपुष्टात आल्यानंतर ऑस्ट्रेलियाकडे 33 धावांची आघाडी होती. यानंतर लगेचच यजमान संघ दुसर्‍या डावातील फलंदाजीसाठी मैदानात आला. ऑस्ट्रेलियाकडून डेव्हिड वॉर्नर आणि हॅरिस मैदानात दाखल झाले. तिसर्‍या दिवसाचा खेळ संपला त्या वेळी ते अनुक्रमे 20 आणि एक धावेवर खेळत असून, ऑस्ट्रेलियाच्या संघाकडे 54 धावांची आघाडी आहे.

Check Also

Have you been on the e, utilizing the thrill off a genuine gambling enterprise sense?

Finest Crazy Go out Gambling establishment Web sites elizabeth Online Uk Do you really discover …

Leave a Reply