Breaking News

मुरूडला पर्यटकांचे उधाण

मुरूड ः प्रतिनिधी

मुरूड व काशिद समुद्रकिनारी पर्यटकांनी तुफान गर्दी केली असून जिथे पाहावे तिथे वाहनांच्या मोठ्या रांगा दिसत होत्या. शनिवार-रविवार त्याचप्रमाणे सोमवारची रजा टाकून मंगळवारच्या प्रजासत्ताक दिनाच्या सुटीचा आनंद घेण्यासाठी हजारोंच्या संख्येने पर्यटक बाहेर पडलेले दिसून आले. समुद्रकिनारी वाहनांच्या गर्दीमुळे वाहतूक व्यवस्थेवर मोठा परिणाम झाला होता.

मुरूड व काशिद या ठिकाणी सर्व लॉजेस व हॉटेल्स हाऊसफुल झाली आहेत. सलग चार दिवसांच्या सुटीचा आनंद उपभोगण्यासाठी समुद्रकिनारी मोठ्या संख्येने पर्यटक येऊन धडकले. ऐतिहासिक जंजिरा किल्ला पाहण्यासाठी राजपुरी येथेही मोठी गर्दी पाहावयास मिळत आहे. पर्यटकांची संख्या जास्त झाल्याने जंजिरा किल्ल्यावरील तिकीट घेण्याची वेळही बदलण्यात आली. तिकीट घेतल्याशिवाय जंजिरा किल्ल्यात प्रवेश मिळत नाही. पूर्वीची वेळ सकाळी 9.30ची होती. आता ती सकाळी 8.30ची करण्यात आली आहे. त्यामुळे मोठ्या संख्येने येणार्‍या पर्यटकांना जंजिरा किल्ला पाहता येत आहे.

राजपुरी नवीन जेट्टी येथे शेकडोंच्या संख्येने वाहनांची गर्दी, तर शिडाच्या बोटीत बसण्यासाठीही पर्यटकांच्या मोठ्या रांगा लागत आहेत.

Check Also

समाजकारणी आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रचार रॅलीला उदंड प्रतिसाद

पनवेल : रामप्रहर वृत्त राजकारणापेक्षा समाजकारणाला अधिक महत्त्व देत जनतेने टाकलेला विश्वास सार्थ ठरवणारे आणि …

Leave a Reply