Breaking News

नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती उत्साहात

रोहे ः प्रतिनिधी

मुंबई विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजनेच्या मार्गदर्शक तत्त्वांना अनुसरून कोकण एज्युकेशन सोसायटीच्या डॉ. चिंतामणराव देशमुख वाणिज्य व सौ. कुसुमताई ताम्हाणे कला महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाने नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंती कार्यक्रमाचे आयोजन केले होते. कार्यक्रमाची सुरुवात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अतुल साळुंके यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून केली.

कार्यक्रमास कार्यक्रम अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य अतुल साळुंके, प्रा. तुळशीदास मोकल, प्रा. शत्रुघ्न लोहकरे, प्रा. सुकुमार पाटील, प्रा. अनिल शिंदे, प्रा. सीमा भोसले, डॉ. कमलाकर कांबळे, डॉ. सम्राट जाधव, प्रा. अनंत थोरात आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. अनंत थोरात यांनी, तर आभार प्रा. सीमा भोसले यांनी मानले.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply