Breaking News

साळाव नाका येथे दुचाकीला अपघात

एक ठार, एक गंभीर
रेवदंडा : प्रतिनिधी
साळाव नाका येथे भरधाव मोटर सायकलचे नियत्रंण सुटल्याने अपघात घडून त्यामध्ये एक ठार व एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. मुरूड-साळाव मार्गे रोहा रस्त्याने चेहेर गावाकडे टि.व्हि.एस. स्टार सीटी एम.एच. 06/एडी/7428 क्रमांकाच्या मोटर सायकलने रविवार (दि.15) पावणेचारच्या सुमारास चालक मदनकुमार कन्हाई रजक वय 40 वर्ष, रा. पिंपरा, बगाही, औरगांबाद, बिहार सध्या रा. साळाव बिर्ला मंदिर नजीक चाळ यांनी जयेंद्र मधूकर माळी रा. चेहेर, ता. मुरूड यांना डबलसीट घेऊन जात होते. साळाव नाका येथील वळणावर रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून अविचाराने व हयगईने बेदरकारपणे भरधाव वेगात धोकादायक पध्दतीने मोटरसायकल चालवित असताना, मोटर सायकलचा ताबा सुटून मोटर सायकलने रस्त्याचे बाजूच्या कठड्याला जोरदार ठोकर मारली. या अपघातात चालक मदनकुमार कन्हाई व डबलसीट बसलले जयेंद्र माळी कठड्याच्या बाजूला असलेल्या हलडे यांचे घराचे मागील छतावर जाऊन आढळले. यामध्ये चालक मदनकुमार कन्हाई यांचे डोक्याला गंभीर दुखापत होऊन ते ठार झाले व मागील डबलशीट बसलेल जयेंद्र माळी गंभीर जखमी झाले आहेत. या अपघातात मोटरसायकलचे मोठे नुकसान झाले तर जखमीस ताबडतोब रूग्णालयाकडे नेण्यात आले. याबाबत रेवदंडा पोलीस ठाणे येथे मोटर वाहन कायदा कलम 184 प्रमाणे भा.द.वि.सं.क 304(अ) 279,337,338 प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला असून याबाबत फिर्याद रवींद्र मधूकर माळी रा. चेहेर यांनी दिली आहे. अधिक तपास रेवदंडा पोलीस ठाणे पो.नि. मुपडे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार भोईर करत आहेत.

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply