Breaking News

रायगड जिल्ह्यासाठी चार कोटी रुपयांचा निधी

भारतरत्न डॉ. एपीजे अब्दुल कलाम अमृत आहार योजना

अलिबाग : प्रतिनिधी

भारतरत्न डॉ. ए पी जे अब्दुल कलाम अमृत आहार योजना राबविण्यासाठी  रायगड जिल्हा परिषदेला (राजिप)   चालू आर्थिक वर्षात चार कोटी 11लाख 61हजार रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. प्राप्त निधीपैकी एक कोटी नऊ हजार 570 रुपयांचा निधी वितरीत करण्यात आला आहे. गरोदर महिला, स्तनदा माता व सात महिने ते सहा वर्षे वयोगटातील बालके अशा एकूण 13हजार 182लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.

कुपोषणाचे प्रमाण कमी करणे, माता व बालमृत्यू रोखणे या मुख्य उद्देशाने आदिवासी विभागाच्या वतीने महिला व बालविकास विभागाच्या समन्वयाने भारतरत्न डॉ. ए पी जे अब्दुल कलाम अमृत आहार योजना राबविण्यात येत आहे. रायगड जिल्ह्यातील कर्जत, पेण, पनवेल, रोहा, खालापूर, सुधागड या सहा तालुक्यांमध्ये ही योजना राबविण्यात येत आहे. योजनेत आठ प्रकल्प व 283 अंगणवाड्या आहेत.   924 गरोदर महिला, ए हजार 97 स्तनदा माता आणि  सात महिने ते सहा वर्षे वयोगटातील 11 हजार 161 बालके अशा एकूण 13हजार 182लाभार्थ्यांना या योजनेचा  लाभ मिळणार आहे.

रायगड जिल्ह्यात ही योजना राबविण्यासाठी चालू आर्थिक वर्षात चार कोटी 11 लाख 61 हजार 500 रुपये निधीची मागणी सरकारकडे करण्यात आली होती. यामधील एक कोटी दोन लाख 90 हजार रुपये निधी ऑगस्ट महिन्यापर्यंत दोन टप्प्यांमध्ये प्राप्त झाला होता. उर्वरित निधी प्राप्त व्हावा यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाकडून राज्य सरकारकडे पत्रव्यवहार करण्यात आला होता त्यानुसार उर्वरित तीन कोटी आठ लाख 71 हजार 500 रुपयांचा निधी सरकारकडून महिला व बालकल्याण विभागाकडे प्राप्त झाला आहे. प्राप्त निधीपैकी एक कोटी नऊ हजार 570 रुपयांचा निधी वितरीत करण्यात आला आहे.

योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जि. प. अध्यक्ष, उपाध्यक्ष, महिला व बालकल्याण समिती सभापती, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील यांचे सहकार्य लाभत असल्याची माहिती महिला व बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी नितीन मंडलिक यांनी दिली.

या योजनेत जिल्ह्यातील सहा तालुक्यांमधील 283 अंगणवाड्या समाविष्ट करण्यात आल्या आहेत. योजनेत जिल्ह्यातील उर्वरित तालुके समाविष्ट करण्यात यावेत यासाठी प्रयत्न करण्यात येतील.

-डॉ. किरण पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी, राजिप

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply