Breaking News

‘त्या’ महिलेचा रिपोर्ट पॉझिटिव्ह; महाडकर धास्तावले

महाड : प्रतिनिधी

महाड तालुक्यातील बिरवाडी मधील एका महिलेला उपचारासाठी मुंबई येथे दाखल केल्यानंतर तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या महिलेच्या मृत्यूनंतर बुधवारी (दि. 29) तिचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. महाडमध्ये कोरोना पॉझिटिव्ह ची हि पहिलीच महिला असल्याने महाडकरांच्या दारी कोरोनाचे संकट आले आहे. महाड तालुक्यातील एक महिला गेली कांही दिवस शहरातील देशमुख हॉस्पिटलमध्ये डायलिसिस करिता येत होती. दिनांक 27 एप्रिल रोजी डायलिसिस करीता आली असता तिला दम लागल्याचे दिसून आले. यावरून तिला मुंबई येथे केईएम रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान सदर महिलेचा मृत्यू झाला. याबाबत देशमुख हॉस्पिटलचे डॉ. फैसल देशमुख यांनी मात्र ती महिला डायलिसिस करीता आलेली होती, तिला श्वसनाचा त्रास होत असल्याचे समजताच तिला मुंबईत उपचारासाठी पाठविले मात्र तेथे या महिलेचा मृत्यू झाला आणि मृत्यूनंतर तिच्या तपासणीत महिला कोरोना निगेटिव्ह आल्याचे डॉ. देशमुख यांनी सांगितले, मात्र या महिलेबाबत आणि आमच्या रुग्णालयाबाबत चुकीची माहिती पसरवली जात असल्याचे त्यांनी सांगितले. या घटनेने नंतर बिरवाडी गाव मात्र ग्रामस्थांनी बंद ठेवले आहे. परंतु बुधवारी (दि. 29) रोजी त्या महिलाची टेस्ट केली असता ती महिला कोरोना पॉझिटिव्ह आली आहे असल्याचे प्रांताधिकारी यांनी सांगितले. त्यामुळे महाडमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply