अलिबाग : प्रतिनिधी
आवास येथील बा. ना. हायस्कूल या ठिकाणी नुकतीच रायगड जिल्हा डायरेक्ट व्हॉलीबॉल जिल्हा अजिंक्यपद व निवड चाचणी स्पर्धा झाली. या स्पर्धेतून सिंधखेड (धुळे) येथे 6 व 7 फेब्रुवारी रोजी होणार्या राज्य अजिंक्यपद स्पर्धेसाठी रायगड जिल्ह्याच्या संघाची निवड करण्यात आली आहे. या संघात राजेश पाटील, (मॉडेल रांजणखार, कर्णधार), निहाल म्हात्रे, (मॉडेल रांजणखार), सुधाकर पाटील, (बहिरीदेव बहिरीचापाडा), विक्रम पाटील (वीर बहिरीदेव बहिरीचापाडा), रोहित पाटील, एवन माणकुळे, अब्दुल दवनाक (बोर्ली), कुणाल मुरूडकर (खालापूर), दयानंद पाटील (न्यू यंग पिंपळपाडा), विजय काटकर (सुधागड पाली), सारंग पाटील (नांदाईचा पाडा), रूपम म्हात्रे, वाघ्रण, रेवण पाटील (प्रशिक्षक रांजणखार), अमित जगताप (व्यवस्थापक खालापूर) यांचा समावेश आहे. संघ निवडण्यासाठी हिरामण भोईर (पिंपळपाड), मोहन धोत्रे (वाघ्रण), विनायक पाटील (रांजणखार) यांनी काम पाहिले. निवडलेल्या संघाचे सराव शिबिर राज्याचे सचिव दीपक मोकल, कोकण विभागप्रमुख शरद कदम, उपाध्यक्ष सुनील म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली रांजणखार येथे झाले. या वेळी सदस्य अविनाश म्हात्रे, पंचप्रमुख प्रसन्न कुमार पाटील, बब्रुवाहन गायकवाड, यतीराज पाटील, हिरामण भोईर व अन्य उपस्थित होते. राज्य अजिंक्यपद स्पर्धेसाठी निरीक्षक म्हणून शरद कदम (खोपोली), पंच प्रमुखपदी रवींद्र म्हात्रे, (खोपोली), निवडकर्ते म्हणून सुनील म्हात्रे व उपपंच प्रमुख म्हणून प्रसन्नकुमार पाटील यांची निवड झाली आहे.