पेण ः प्रतिनिधी
पेणमधील रामवाडी बसस्थानकात पार्क करून ठेवलेल्या शिवशाही बसमधील एलईडी चोरणार्यास पोलिसांनी अटक केली आहे. फिर्यादीने त्यांच्या ताब्यातील शिवशाही बस विभागीय कार्यशाळा रामवाडी येथे पार्क केली होती. त्यामधील 4200 रुपयांचा एलईडी डिस्पले आरोपीने चोरून नेला होता.
या प्रकरणी सदर आरोपीला 8 जून रोजी रात्री अटक करण्यात आली. याबाबत पेण पोलीस ठाण्यात गुन्हा र. जि. क्र. 100/2020 भा. दं. वि. कलम 381प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस नाईक सावंत करीत आहेत.
महामार्गावरील अपघातात दोन जण जखमी पेण ः मुंबई-गोवा महामार्गावर वडखळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत खारढोबी गावच्या हद्दीत स्विफ्ट कारचालक बुधवारी सकाळी मुंबई ते नागोठणे जाताना पुढील वाहनास ओव्हरटेक करताना डम्परला धडक बसल्याने अपघात झाला. यात सुमित पवार व विशाल शिगम जखमी झाले असून सरकारी हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत.