पनवेल ः वार्ताहर
33 मावळ लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना-भाजपा-रिपाइं व रासप महायुतीचे उमेदवार श्रीरंग (आप्पा) बारणे यांच्या श्री साई मंदिर, बेलपाडा खारघर येथील मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन काल सिडको अध्यक्ष, भाजपा रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले.
या वेळी सिडको अध्यक्ष, भाजपा रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह शिवसेना रायगड जिल्हा समन्वयक अनिल चव्हाण, उत्तर रायगड जिल्हा संपर्कप्रमुख दत्ताजी दळवी, जिल्हाप्रमुख शिरीष घरत, महिला जिल्हा संपर्क संघटक किशोरीताई पेडणेकर, जिल्हा सल्लागार बबनदादा पाटील, उपजिल्हाप्रमुख रामदास पाटील, भाजपा उपाध्यक्ष वासुदेव घरत, तालुकाध्यक्ष प्रल्हाद केणी, शिवसेना तालुुका संघटक भरत पाटील, पनवेल विधानसभा संघटक दीपक निकम, महानगरप्रमुख रामदास शेवाळे, नगरसेवक अभिमन्यू पाटील, तालुकाप्रमुख परेश पाटील, उपजिल्हा संघटक कल्पना पाटील, कुंदा मेगडे, नगरसेविका लीना गरड, भाजपा खारघर शहराध्यक्ष ब्रिजेश पटेल, नगरसेवक प्रवीण पाटील, रामजीभाई बेरा, समीर कदम, दीपक शिंदे, गीता चौधरी, मोना अडवाणी, साधना पवार, लीना गोवारी, कृष्णकांत कदम, महेश गुरव आदींसह महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.