Breaking News

वणव्यामुळे डोंगरांची शोभा हरवतेय

रोखण्याचे सर्वांसमोर आव्हान; वन्यप्राणी, पक्ष्यांना झळ

माणगांव : प्रतिनिधी

लांबलेल्या पावसाने हिरवेगार दिसणारे डोंगर उन्हाळा वाढू लागल्या नंतर अचानक काळे दिसू लागले आहेत. उन्हाची तीव्रता वाढू लागल्यानंतर माळरानावर पसरलेले गवत सुकू लागले आहे. या सुकणार्‍या गवताना अचानक वणवे लागत असून मानवनिर्मित या वणव्यांमुळे डोंगरांचा रंग काळा दिसत आहे. एरवी हिरवेगार दिसणारे डोंगर उन्हाळा सुरू होताच वणव्यामुळे काळे दिसू लागल्याने डोंगरांची शोभा हरवत चालली आहे. काही महिन्यांपासून उन्हाचा पारा वाढत आहे. तीव्रता वाढत असतानाच डोंगरांना अचानक आग लागून वणवे लागण्याचे प्रमाण वाढले आहे. वृक्षराजींनी समृद्ध असलेल्या या डोंगररांगा वणव्यामुळे ओसाड, उजाड होत आहेत. या वणव्यात मोठया वृक्षांच्या बरोबरीने लहान रोपांचीही हानी होत आहे. आंबे, काजू यासारखी फळझाडे करपून जात आहेत. यामुुळे फळपीकमोहोर होरपळून जात असल्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. वन्य प्राण्यांनाही या वनव्याच्या मोठया प्रमाणात झळा बसत असून त्यांचे अधिवास नष्ट होत आहेत.वेळीच वणवे रोखली नाहीत तर जैवविविधता धोक्यात येईल.

वनव्याचे प्रमाण वाढले आहे. यामुळे डोंगर काळे दिसू लागले आहेत.  निसर्ग सौंदर्य बिघडत चालले असून, पर्यावरणाची हानी होतेये. त्यामुळे जनजागृती करून वणवे लावण्याचे प्रमाण कमी केले पाहिजे.

-राम मुंढे, पर्यावरणप्रेमी, अभ्यासक

 

गेल्या काही दिवसांपासून वणवे लागत असल्याने आंबा, काजू पिकांचे नुकसान होत आहे. नुकताच मोहोर येऊ लागला आहे. हा मोहोर करपून जाण्याची श्यक्यता आहे. वनसंपत्ती बरोबर, पशुपक्ष्यांना या वणव्याचा त्रास होत आहे. वेळीच हे वणवे रोखले पाहिजे.

-प्रदीप लांगी, निसर्गप्रेमी

Check Also

केरळ विधानसभा निवडणुकीसाठी आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून भाजपचा जोरदार प्रचार

पनवेल : रामप्रहर वृत्तकेरळ विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने रणनीती आखली असून कासरगोड विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी …

Leave a Reply