उरण : वार्ताहर – कोरोना संसर्ग पसरू नये या करिता सर्वत्र लॉक डाऊन करण्यात आले आहे. हातावर पोट असलेल्या गरिबांना काम मिळणे बंद झाले आहे. त्यांच्या वर उपासमारीची वेळ आली असून गरिबांना मदत देण्यासाठी द्रोणागिरी स्पोर्ट्स असोसिएशन वमित्र परिवार यांच्या वतीने गेली कित्येक दिवस पुढे आली आहे. त्यांनी गरिबांना धान्य देण्याचे काम शनिवारी (दि. 28) सुरु केले आहे. प्रत्येकी दोन किलो तांदुळ व डाळ, गोडेतेल, तुरडाळ आदी जीवनावश्यक सामान गरिबांच्या घरी देऊन काम केले आहे.
उरण तालुक्यात नवघर फाटा झोपडपट्टी, पागोटे ब्रिज झोपडपट्टी, हनुमान, कोळीवाडा, केगाव, चाणजे झोपडपट्टी,एमएसईबी झोपडपट्टी, अंबिकावाडी नागाव, करंजा, पाणजे सातघर, बोरी, उरण चारफाटा, पागोटे, समाज प्रबोधन समोरील झोपडपट्टी, तसेच परिसरातील गरिबांना धान्य देण्याचे कौतुकास्पद काम केले आहे.
या वेळी द्रोणागिरी स्पोर्ट्स असोसिएशनचे अध्यक्ष महादेव घरत, एल. बी. पाटील, सीमा घरत, नाहिदा ठाकूर, दिनेश पाटील, सचिन पाटील, प्रकाश घरत, रुपाली कोळी, फारुख खान, शरद ठाकूर, विकास कडू, दिलीप तांडेल, शरद पाटील, मिथुन म्हात्रे, हेमंत माळी, मनिराम पाटील, नरेश म्हात्रे, अक्षय पाटील, प्रेमनाथ घरत, सामाजिक कार्यकर्ते शकीर शेख व द्रोणागिरी स्पोर्ट्स असोसिएशनचे सर्व सदस्य आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
गरिबांना या वेळेस मदत करणे म्हणजे भुकेलेल्या घास देणे होय, सर्वांनी मदत करावी आपल्या परीने शक्य होईल त्या स्वरुपाची मदत करा, अन्नदान हे फार मोठे दान आहे. अशी प्रतिक्रिया द्रोणागिरी स्पोर्ट्स असोसिएशनचे अध्यक्ष महादेव घरत यांनी व्यक्त केली.