Breaking News

रावबहादूर लोखंडे यांना स्मृतिदिनी अभिवादन

पनवेल ः प्रतिनिधी 

नवीन पनवेल येथील भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयात मंगळवारी (दि. 9) अखिल भारतीय कामगार चळवळीचे आद्यजनक रावबहादूर नारायण मेघजी लोखंडे यांचा स्मृतिदिन भाजप ओबीसी मोर्चाचे अध्यक्ष अ‍ॅड. मनोज भुजबळ आणि उत्कर्ष कला व क्रीडा मंडळ, नवीन पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने साजरा करण्यात आला. माजी उपनगराध्यक्ष सुभाष भुजबळ यांच्या हस्ते रावबहादूर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. या वेळी भारतीय जनता पक्षाचे ओबीसी मोर्चा अध्यक्ष अ‍ॅड. मनोज भुजबळ यांनी रावबहादूर लोखंडे यांना अभिवादन करून आपले मनोगत व्यक्त केले.

रावबहादूर यांचे पणतू गोपीनाथ लोखंडे व त्यांचा परिवार, अनंत भुजबळ, संजय काकरीया, क्रांतिकुमार चितळे, नितीन भुजबळ, बेंजामीन खराडे, हेमंत भुजबळ, भालचंद्र म्हात्रे, नीता जोशी, कुंदा पवार, मोनिका ताम्हाणे, राकेश भुजबळ, अजित लोंढे, राजश्री भुजबळ, प्रशांत फुलपगारे, संदेश ढवळे आदी या वेळी उपस्थित होते.

Check Also

तळोजातील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा

कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा फेज 1मधील …

Leave a Reply