कर्जत : बातमीदार
हर घर तिरंगा अभियाना अंतर्गत विद्या विकास मंडळ या संस्थेच्या नेरळ येथील विद्या विकास मंदिर शाळेच्या विद्यार्थ्यांनी लेझीमच्या तालावर नाचत तिरंगा रॅली काढून जनजागृती केली.
नेरळ गावातील विद्या विकास मंदिर या शाळेत स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्त हर घर झेंडा हर घर तिरंगा अभियान राबविले जात आहे. त्यानिमित्ताने मुख्याध्यापिका शैलजा निकम यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेच्या विद्यार्थ्यांनी लेझिम आणि ढोल-ताशाच्या तालावर हातात तिरंगा घेवून नेरळ गावात जनजागृती रॅली काढली होती. बाजारपेठ भागातील चौकात लेझिम पथकाचे संचलन झाले. शाळेच्या इंग्रजी माध्यमाच्या मुख्याध्यापिका स्नेहा म्हसे, ज्येष्ठ शिक्षिका नीलाक्षी सुर्वे, रेखा काळे, यशस्विनी सहस्त्रबुद्धे, ललिता बदे, नितीन सुपे, कोमल पळसकर, स्नेहल बदले, कांचन नाईक, रोहिणी कुडतरकर, बालवाडी विभागाच्या अस्मिता पवार, सीमा दिघे, स्वाती तुपगावकर यांच्यासह विद्यार्थी या जनजागृती रॅलीत सहभागी झाले होते.