उरण : वार्ताहर
भारतीय जनसंघाच्या शिल्पकारांपैकी एक प्रखर राष्ट्राभिमानी व्यक्तिमत्व पंडीत दीनदयाळ उपाध्याय यांच्या पुण्यतिथीनिमित्त उरण तालुका भारतीय जनता पक्षाच्या वतीने आमदार महेश बालदी यांच्या संपर्क कार्यालयात गुरुवारी (दि. 11) अभिवादन करण्यात आले.
या वेळी भाजप तालुका अध्यक्ष तथा नगरसेवक रवी भोईर, उपनगराध्यक्ष जयविन्द्र कोळी, शहर अध्यक्ष तथा नगरसेवक कौशिक शाह, उत्तर रायगड जिल्हा उपाध्यक्ष नीलकंठ घरत, तालुका सरचिटणीस सुनील पाटील, तालुका युवा अध्यक्ष शेखर पाटील, तालुका उपाध्यक्ष प्रकाश ठाकूर, चिरनेर विभागीय अध्यक्ष शशी पाटील, माजी नगरसेवक राजेश कोळी, चाणजे वार्ड नंबर 1 बूथ अध्यक्ष विनोद नाखवा, चाणजे वार्ड नंबर 2 बूथ अध्यक्ष सिद्धार्थ अमरनाथ नाखवा, भाजप कार्यकर्ते महेश माळी, महेश कोळी आदी कार्यकर्ते उपस्थित होते.