Breaking News

वंदे मातरम संघटनेची बैठक

तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांची प्रमुख उपस्थिती

पनवेल : रामप्रहर वृत्त

भाजप पुरस्कृत वंदे मातरम संघटनेची बैठक गुरुवारी

(दि. 11) झाली. या बैठकीमध्ये सांगुर्लीमधील चिंचवन गावातील जगदीश पाटील यांनी पक्षा विरोधी काम केल्याने तसेच सरपंच व उपसरपंच निवड प्रक्रियेमध्ये सहकार्य न केल्याने त्यांची संघटनेतून निलंबीत करण्यात आले असून, त्यांची आयटीआय टॅक्सी नाक्याच्या अध्यक्ष पदावरुन हकालपट्टी करण्यात आली आहे. ही बैठक भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या प्रमुख उपस्थितीत झाली.

पनवेल तालुक्यातील सांगुर्ली ग्रामपंचायत निवडणुकीत वॉर्ड क्रमांक 1 मधून सुवर्णा जगदीश पाटील यांना भाजपचे उमेदवारी देऊन त्यांना निवडुन आणण्याचे काम भाजपने केले. मात्र सांगुर्ली जगदीश पाटील यांनी सरपंच आणि उपसरपंचपदाच्या निवडणुकीत पक्षाविरोधी काम करुन या निवडणुक प्रक्रियेमध्ये सहकार्य केले नाही. त्यामुळे भाजपच्या मध्यवर्ती कार्यालयात गुरुवारी वंदे मातरम संघटनेच्या बैठकीत जगदीश पाटील यांना आयटीआय टॅक्सी नाक्याच्या अध्यक्ष पदावरून हकालपट्टी करून त्यांना संघटनेतून निलंबीत करण्याची घोषणा संघटनेचे उपाध्यक्ष रवि नाईक यांनी केली.

या बैठकीला संघटनेचे अध्यक्ष अध्यक्ष जितेंद्र घरत, उपाध्यक्ष रवि नाईक, पांडुरंग पाटील, माजी सरपंच आणि सांगुर्ली विभागातील नेते दत्तात्रय हातमोडे उपस्थित होते.

Check Also

पोषण आहारात मृत उंदीर सापडल्याच्या घटनेतील तपासणीचे नमुने नाकारणार्‍या प्रयोगशाळांवर कारवाई करणार

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रश्नावर ना.आदिती तटकरेंचे उत्तर पनवेल : रामप्रहर वृत्ततपासणीसाठी पाठवलेले नमुने नाकारणार्‍या …

Leave a Reply