Breaking News

श्री साई नारायण बाबा यांच्या जन्मोत्सवानिमित्त विविध कार्यक्रम

पनवेल : वार्ताहर

प. पू. सद्गुरु श्री साई नारायण बाबा यांच्या 84व्या जन्मोत्सवानिमित्त पनवेलमध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याने साई भक्तांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे. पनवेल येथील रेल्वे स्टेशन परिसरात असलेल्या श्री साई बाबांच्या मंदिराच्या प. पू. सद्गुरु श्री साई नारायण बाबा यांचा 84वा जन्मोत्सव समारंभ (वार्षिक बालदिवस उत्सव) मोठ्या उत्साहात व विविध सामाजिक कार्यक्रमाद्वारे साजरा करण्यात येणार आहे. या निमित्ताने श्री साई नारायण बाबा आश्रम पनवेल येथे रविवारी (दि. 16) मोफत वैद्यकीय तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानंतर मंगळवारी (दि. 18) सामुहिक कन्यादान कार्यक्रम आयोजन करण्यात आले आहे. बुधवारी (दि. 19) महासत्यनारायण पूजेचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच अन्नदान कार्यक्रम, साई भजन संध्या व मुलांचे फॅन्सी ड्रेस कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे. गुरुवारी (दि. 20) 84व्या जन्मोत्सवानिमित्त सकाळी श्री गुरुजींचे जन्म वेळेस जन्मोत्सव समारंभ त्यानंतर विशेष कार्यक्रम महा आयुष्य होम, कनक अभिषेक, महा मंगल स्नान, तुलाभार, पुष्प अभिषेक, चरण पूजा, मुलांचे विविध कार्यक्रम व महाप्रसादाचे वितरण करण्यात येणाार आहे. तरी या सर्व कार्यक्रमात साई भक्तांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.

Check Also

केरळ विधानसभा निवडणुकीसाठी आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून भाजपचा जोरदार प्रचार

पनवेल : रामप्रहर वृत्तकेरळ विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने रणनीती आखली असून कासरगोड विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी …

Leave a Reply