मोहोपाडा : प्रतिनिधी
रामकृष्णा अकॅडमी व हरिग्राम केवाळे व्हिलेज यांच्या वतीने जिल्हास्तरावर किक-बॉक्सिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत मोहोपाडा, रसायनीतील खेळाडूंनी सहभाग घेत सुयश संपादन केले आहे.
रसायनीतील किक बॉक्सिंग प्रशिक्षक संजय काशिनाथ पाटील व त्यांच्या खेळाडूंनी चार सुवर्ण आणि पाच रौप्यपदके पटकाविली. यात वेदांत सोनावणे, अजय जाधव, प्रांजल धुमाळ, आर्यन दिलोड यांनी सुवर्ण, तर आतिष आखाडे, श्रवण शिंदे, विनायक पाटील, ज्ञानेश्वर कदम, अनुसया कदम यांनी रौप्यपदक जिंकले.
या सर्व खेळाडूंची पुणे येथे होणार्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. याबद्दल त्यांचे संस्थेचे अध्यक्ष डॉ. मंदार पनवेलकर यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
Check Also
माथेरानकर अनुभवणार सुलभ, स्वस्त प्रवास
ई-रिक्षाच्या सुविधेमुळे पर्यटकांसह नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण माथेरान : रामप्रहर वृत्त दहा वर्षांपूर्वी नगरपरिषदेच्या तत्कालीन लोकप्रतिनिधीनी …