Breaking News

पालीत माघी गणेशोत्सवाला प्रारंभ

यात्रेसह विविध उपक्रम रद्द

पाली : प्रतिनिधी

अष्टविनायकांपैकी पाली (ता. सुधागड) येथील बल्लाळेश्वर देवस्थानच्या माघी गणेशोत्सवाला शुक्रवार (दि. 12) पासून सुरुवात झाली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासन नियम व अटी शर्थीचे पालन करून उत्सव साजरा होत आहे.

येत्या सोमवारी (दि. 15) माघी गणेशोत्सव असून, पालीतील बल्लाळेश्वर देवस्थानच्या जन्मोत्सवाला शुक्रवारपासून सुरूवात झाली आहे. त्यानिमित्त बल्लाळेश्वर मंदिर परिसरात रोषणाई व सजावट करण्यात आली आहे. कोरोनामुळे यंदा  मर्यादा व बंधने आल्याने येथील यात्रा आणि काही उपक्रम होणार नाहीत. यात्रेसाठी अथवा रस्त्यावर दुकाने लावण्यासाठी कोणत्याही प्रकारची परवानगी नाही.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासन नियम व अटी शर्थीचे पालन करून उत्सव साजरा करण्यात येत आहे. मास्क व सॅनिटायझरचा वापर करण्याच्या सूचना भाविकांना दिल्या जात आहेत. तसेच वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी जागोजागी सुरक्षारक्षक नेमले आहेत.

-अ‍ॅड. धनंजय धारप, अध्यक्ष, बल्लाळेश्वर देवस्थान ट्रस्ट, पाली

Check Also

शरद पवार गटातील राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍यांचे लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी केले भाजपमध्ये स्वागत

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल मतदार संघात आमदार प्रशांत ठाकूरांनी केलेल्या विकासकामांवर आणि त्यांच्या कार्यप्रणालीवर …

Leave a Reply