Breaking News

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते जितेंद्र म्हात्रे यांचा सत्कार

पनवेल ः वार्ताहर

गोवठणे गावचे सुपूत्र जितेंद्र अनंत म्हात्रे यांना नुकतेच रायगड जिल्हा परिषदेकडून रायगड भूषण या पुरस्काराने गौरवण्यात आले. याबद्दल पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी त्यांचा विशेष सत्कार करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

तालुक्यातील अरिहंत सोसायटी येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमात समस्त पनवेल गुरुद्वाराच्या वतीने रायगड भूषण जितेंद्र म्हात्रे यांचा सत्कार आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आला.

जितेंद्र म्हात्रे यांनी प्रख्यात गायक शंकरबुवा म्हात्रे आणि निवृत्तीबुवा चौधरी यांच्याकडून मार्गदर्शन घेऊन संगीत कलेत त्यांनी आपले नाव कोरले. मराठी वाहिनीवर त्यांनी भजन कला सादर केली आहे. तसेच नाटकांमध्ये संगीतकार म्हणून कार्य केले आहे.

त्यांनी संगीत क्षेत्रात अधिकाधिक व्यापकता निर्माण करून सरस्वती देवीची सेवा करून आगामी काळातसुद्धा चांगले शिष्य निर्माण करावेत, अशा शुभेच्छा आमदार प्रशांत ठाकूर यांनी त्यांना दिल्या आहेत. याबद्दल पनवेल महानगरपालिकेचे ज्येष्ठ नगरसेवक अनिल भगत यांनीसुद्धा त्यांचे अभिनंदन करून केले.

Check Also

पनवेल रेल्वेस्थानकात आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून पाहणी

पनवेल ः रामप्रहर वृत्तपनवेल रेल्वेस्थानक परिसरात सध्या नवीन रेल्वे ट्रॅक, पार्किंग आणि प्लॅटफॉर्मवरील विविध कामे …

Leave a Reply