Breaking News

पाली शहरात भटक्या कुत्र्यांची दहशत

बंदोबस्त करण्याची नागरिकांची मागणी

सुधागड ः प्रतिनिधी

पाली शहरात मोकाट व भटक्या कुत्र्यांची दहशत पसरली आहे. घोळक्याने फिरणार्‍या या भटक्या कुत्र्यांमुळे नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे या कुत्र्यांचा ठोस बंदोबस्त करण्याची मागणी नागरिक करीत आहेत.

पाली नगरपंचायत कार्यालयात काही दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीत ही समस्या मांडण्यात आली होती. या वेळी नगरपंचायतीचे प्रशासक दिलीप रायन्नावार यांनी याबाबत उपाययोजना केली जाईल, असे आश्वासन दिले आहे. हे भटके कुत्रे लहान मुले, वृद्ध, महिला व पादचार्‍यांच्या अंगावर धाव घेतात. रस्त्यावर अनेक वेळा मोटरसायकलला अडथळा करीत असल्याने अपघातदेखील घडले आहेत.

या भटक्या कुत्र्यांमुळे रात्री व पहाटे फिरणेही जिकिरीचे झाले आहे. मॉर्निंग वॉकला जाणार्‍या नागरिकांना तर जीव मुठीत घेऊन जावे लागते. त्यामुळे या भटक्या व मोकाट कुत्र्यांचा कायमस्वरूपी बंदोबस्त किंवा नसबंदी करावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून करण्यात येत आहे.

Check Also

पनवेल महापालिकेच्या विविध विकासकामांचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते भूमिपूजन

पनवेल ः रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका महाराष्ट्र राज्य, देश अशा सर्व स्तरावर पुढे जाण्यासाठी आगेकूच …

Leave a Reply