Breaking News

पैसा भी और इज्जत भी!

ख्रिस मॉरिससाठी वीरूचे हटके ट्विट

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था

आयपीएलमध्ये गुरुवारीदिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या सामन्यात राजस्थानच्या ख्रिस मॉरिसने अखेरच्या षटकांमध्ये तुफानी फटकेबाजी करीत संघाला विजय प्राप्त करून दिला. हाच धागा पकडून भारताचा माजी स्फोटक फलंदाज वीरेंद्र सेहवागने त्याच्या हटके शैलीत ट्विट केले आहे.

यंदाच्या आयपीएलच्या लिलावात सर्वांत महागडा खेळाडू ठरलेल्या ख्रिस मॉरिसने राजस्थानचा निम्मा संघ माघारी परतलेला असताना जोरदार फटकेबाजी करीत निसटलेला सामना खेचून आणला आणि संघाला विजय प्राप्त करुन दिला. मागच्या सामन्यात न मिळालेल्या स्ट्राइकचा वचपाच जणू मॉरिसने काढला.

सेहवागने ख्रिस मॉरिसचे पंजाब आणि दिल्लीविरुद्धच्या सामन्याचे दोन फोटो ट्विट केले आहेत. पंजाबविरुद्धच्या सामन्यात मॉरिसला स्ट्राइक मिळाली नव्हती. म्हणून पैसा मिला पर इज्जत नही मिली, असे पहिल्या फोटोला सेहवागने कॅप्शन दिलेय, तर दिल्लीविरुद्धच्या सामन्यात मॉरिसने दमदार कामगिरी केली. या फोटोला सेहवागने ’इसे कहतें हे इज्जत’, असं कॅप्शन दिलेय. ‘इज्जत भी, पैसा भी… वेल डन ख्रिस मॉरिस,’ असे म्हणत सेहवागने त्याच्या कामगिरीचे कौतुक केले आहे.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply