Breaking News

अमन लॉज-माथेरान शटलसेवेकडे प्रवाशांचा वाढता ओघ

माथेरान ः प्रतिनिधी

मध्य रेल्वेची अमन लॉज-माथेरान शटलसेवा पुन्हा सुरू झाल्यापासून 90,753 प्रवाशांची आणि 11,879 पॅकेजेसची वाहतूक झाली आहे. 4 नोव्हेंबर रोजी सुरू झालेल्या आणि माथेरान या गंतव्यासाठी पर्यटकांच्या संख्येत सातत्याने वाढ झाल्यामुळे अमन लॉज आणि माथेरानदरम्यानच्या सेवा हळूहळू चारवरून 14पर्यंत वाढविण्यात आल्या आहेत. मागील 101 दिवसांत 90,753 प्रवाशांनी या सेवेचा लाभ घेतला.

मुंबईतील नागरिकांसाठी माथेरान हे सर्वांत जवळचे आणि लोकप्रिय पर्यटनस्थळ आहे. कोरोना अनलॉक कालावधीत पर्यटकांनी येथील नैसर्गिक वातावरणात विश्रांती घेण्यासाठी पसंती दिली. वीकेण्ड माथेरानमध्ये घालवण्यासाठी या गाड्यांतील 1070 तिकिटे 12 फेब्रुवारी रोजी आरक्षित करण्यात आली. या पर्यटनस्थळी येणार्‍या प्रवाशांच्या सुरक्षित प्रवासासाठी रेल्वे महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहे. अमन लॉज-माथेरान शटलसेवा वेगात सुरू झाल्याने स्थानिकांना उदरनिर्वाहाची संधी मिळत असून, माथेरानची अर्थव्यवस्था सुधारण्यासही हातभार लागत आहे.

Check Also

अखिल भारतीय टेबल टेनिस स्पर्धेत स्वस्तिका घोष विजेती

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याकडून अभिनंदन पनवेल : रामप्रहर वृत्त अखिल भारतीय आंतर संस्थात्मक टेबल टेनिस …

Leave a Reply