Breaking News

शाश्वत विकासासाठी भाजपला साथ द्या; युवा नेते वैकुंठ पाटील यांचे आवाहन; शेडोशीत प्रचारफेरी

पेण : प्रतिनिधी

पेण पूर्व विभागातील शेडोशी ग्रामपंचायतीच्या मूलभूत व शाश्वत विकासासाठी 31 ऑगस्टला होणार्‍या सार्वत्रिक निवडणुकीत मतदारांनी भाजप उमेदवारांना निवडून द्या, असे आवाहन युवा नेते वैकुंठ पाटील यांनी बुधवारी (दि. 28) शेडोशी येथे केले. शेडोशी ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाची निवडणूक 31 ऑगस्टला होत आहे. या निवडणुकीतील भाजपचे उमेदवार प्रकाश कदम यांच्या प्रचार रॅलीचा शुभारंभ बुधवारी गावातील केदारनाथ मंदिरात नारळ वाढवून करण्यात आला. या वेळी झालेल्या कार्यक्रमात वैकुंठ पाटील बोलत होते. भाजपच गावाचा विकास करू शकतो. भाजपचे सरपंच पदाचे उमेदवार प्रकाश कदम यांना भरघोस मतांनी निवडून द्या, असे आवाहन त्यांनी या वेळी केले.

वैकुंठ पाटील पुढे म्हणाले की, ही ग्रामपंचायत अनेक वर्षे शेकापच्या ताब्यात होती. शेकापने या ग्रामपंचायतीला विकासापासून वंचित ठेवले आहे. येथील पूल व रस्ते हे माजी मंत्री रविशेठ पाटील यांच्या कार्यकाळात झाले आहेत. शेकाप पुढार्‍यांच्या ढोंगी राजकारणाला कंटाळून गावातील तरुण या वेळी भाजपमध्ये दाखल झाले.

भाजपचे उमेदवार प्रकाश कदम यांच्या प्रचारासाठी केदारनाथ मंदिरापासून काढण्यात आलेली रॅली ग्रामपंचायत हद्दीतील मायणी, मालदेव, तळदेव, फणसीची वाडी, खडकी आदी गावांत फिरवण्यात आली. या वेळी भाजपचे विकास म्हात्रे, उमेदवार प्रकाश कदम, पाटणेश्वर अर्बन बँकेचे संचालक सीताराम पाटील, ग्रामपंचायत सदस्य भारत जाधव, ज्ञानेश्वर सावंत, राधिका पवार, जानकी वाघ, नितीन जाधव, तसेच लक्ष्मण पवार, पांडुरंग पवार, रामचंद्र कदम, आनंद पवार, सखाराम कदम, रमेश पवार, श्रीपाद पवार, दौलती पवार, सतीश जाधव, संजय जाधव, श्रीरंग जाधव, लक्ष्मण सावंत, देवजी सावंत, राजेंद्र वाळज, गणेश लक्ष्मण जाधव आदींसह ग्रामस्थ या वेळी उपस्थित होते.

Check Also

करिअरविषयक मार्गदर्शन सत्राला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

पनवेल : रामप्रहर वृत्तसध्या जगात एआय तंत्रज्ञानावर आधारित सर्वाधिक संधी असल्यामुळे विद्यार्थ्यांनी एआयसोबत लवकरच परिचित …

Leave a Reply