Breaking News

वाहतूक पोलिसांकडून देवदूतांचा सत्कार

पोलादपूरच्या नूरी पालोजी यांचा विशेष गौरव

पोलादपूर : प्रतिनिधी

रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत पोलादपूर तालुक्यातील कशेडी टॅप वाहतूक पोलिसांकडून अपघाताच्या वेळी मदत करणार्‍या पोलादपूर आणि खेड तालुक्यातील देवदुतांचा सत्कार करण्यात आला.  या वेळी कशेडी घाटातील दरीत कोसळलेली वाहने क्रेनच्या सहाय्याने बाहेर काढण्यासाठी सहकार्य करणारे नूरी पालोजी (रा. पोलादपूर) यांचा विशेष गौरव करण्यात आला.

वाहतूक सुरक्षा काळामध्ये केलेल्या जनजागृतीनुसार नागरिकांनी वाहतुकीचे नियम पाळून अपघात न होण्याबाबत काळजी घ्यायची आहे, असे आवाहन महामार्ग पोलीस केंद्राचे सहाय्यक उपनिरिक्षक बोडकर यांनी या वेळी केले.

पोलादपूर तालुक्यातील कशेडी येथील मुकुंद राजाराम मोरे, समीर प्रकाश मोरे व महेश भिवा रांगळे  तसेच खेड तालुक्यातील संतोष गोपाळ सागवेकर (भरणे नाका), विलास धोंडू पाटणे (रा. तुळशी),  शिवाजी श्रीधर यादव (रा. वेरळ), प्रसाद दिलीप गांधी (रा. कुळवंडी) आणि खेड जेसीस क्लबचे अध्यक्ष पराग पाटणे व सहकारी आदींचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. पोलादपूर पोलीस ठाण्याचे उपनिरिक्षक चांदणे, पळचिलचे सरपंच मोरे आदी उपस्थित होते.

Check Also

तळोजातील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा

कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा फेज 1मधील …

Leave a Reply