पनवेल : रामप्रहर वृत्त
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून आकुर्ली मालेवाडी येथे भाजप पुरस्कृत वंदे मातरम जनरल कामगार संघटनेच्या वतीने उभारण्यात आलेल्या श्री गावदेवी शेअर रिक्षा चालक-मालक संघटना यांच्या रिक्षा स्टॅण्डचे उद्घाटन शुक्रवारी (दि. 19) भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते करण्यात आले. या उद्घाटन सोहळ्याला रायगड जिल्हा परिषद सदस्य अमित जाधव, पंचायत समिती सदस्य भूपेंद्र पाटील, पनवेल तालुका युवा मोर्चा अध्यक्ष आनंद ढवळे, आकुर्ली ग्रामपंचायतीचे सरपंच सचिन पाटील, उपसरपंच विलास मस्कर, सुकापूर ग्रामपंचायतीच्या सरपंच योगिता पाटील, उपसरपंच अशोक पाटील, ग्रामपंचायत सदस्य मच्छिंद्र पाटील, पुष्पा म्हस्कर, जितेंद्र पाटील, सत्यवान धरणेकर, निलेश भगत, प्राची जाधव, पूनम भगत, प्रमोद भगत, राजेश पाटील, महेश पाटील, सिताराम पाटील आदी उपस्थित होते. या वेळी तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांनी भूपेंद्र पाटील यांनी केलेल्या या कार्याचे कौतुक केले व त्यांचे आभार मानले.