Breaking News

रायगड जिल्ह्यात 194 ठिकाणी टँकर्सने पाणीपुरवठा

अलिबाग : प्रतिनिधी

रायगड जिल्ह्यात पाणीटंचाईची समस्या वाढत चालली असून सध्या 35 गावे व 159 वाड्या मिळून एकूण 194 ठिकाणी 20 टँकर्सने पाणीपुरवठा केला जात आहे.

अलिबाग तालुक्यातील दोन गावे, खालापूर तालुक्यातील सहा गावे, तीन वाड्या, पेण तालुक्यातील 19 गावे व 88 वाड्या, महाड तालुक्यातील आठ गावे 59 वाड्या, पोलादपूर तालुक्यातील नऊ वाड्यांमध्ये टँकर्सने पाणीपुरवठा केला जात आहे.

या संभाव्य पाणीटंचाई निवारणासाठी जिल्हा प्रशासनाने यावर्षी नऊ कोटी 94 लाख 24 रुपयांचा पाणीपुरवठा आराखडा तयार केला आहे. गतवर्षी 11 कोटी 39 लाख रुपयांचा पाणीपुरवठा आराखडा तयार करण्यात आला होता. यावर्षीच्या पाणीटंचाई कृती आराखड्यामधील एक हजार 166 गावे आणि वाड्यांना टँकर, बैलगाडीद्वारे पाणीपुरवठा करण्याचे नियोजन आहे. तर 446 गावांमध्ये नव्याने विंधण विहिरी प्रस्तावित करण्यात आल्या आहेत.

जिल्ह्यातील संभाव्य पाणीटंचाईग्रस्त गावांमध्ये अलिबाग तालुक्यातील 56 गावे, 148 वाड्या, उरण तालुक्यातील आठ वाड्या, पनवेल तालुक्यातील 26 गावे, 53 वाड्या, कर्जत तालुक्यातील 22 गावे, 66  वाड्या, खालापूर तालुक्यातील 20 गावे, 41 वाड्या, पेण तालुक्यातील 70 गावे, 245 वाड्या, सुधागड तालुक्यातील 12 गावे, 43 वाड्या, रोहा  तालुक्यातील 34 गावे, 33 वाड्या, माणगाव तालुक्यातील 47 गावे, 64 वाड्या, महाड तालुक्यातील 58 गावे, 242 वाड्या, पोलादपूर तालुक्यातील 88 गावे, 220 वाड्या, म्हसळा तालुक्यातील 18 गावे, 14 वाड्या, श्रीवर्धन तालुक्यातील 19 गावे, 82 वाड्या, मुरूड  तालुक्यातील 12 गावे, 13 वाड्या आणि तळा तालुक्यातील 39 गावे, 42 वाड्यांचा समावेश आहे.

Check Also

आमदार महेश बालदींच्या उपस्थितीत विविध पक्षांतील कार्यकर्ते भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त आमदार महेश बालदी यांचे सक्षम नेतृत्व मान्य करून व विकासात्मक धोरणावर …

Leave a Reply