कर्जत : प्रतिनिधी
ज्येष्ठ नागरिकांसाठी सभागृह बांधण्याच्या कामाचे भूमिपूजन नगराध्यक्षा सुवर्णा जोशी यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी नगर परिषद क्षेत्रातील नाना मास्तर नगर येथील व्यायाम शाळेवर पत्र्याची शेड टाकण्याचा शुभारंभही करण्यात आला.
नगर परिषदेचे बांधकाम सभापती विवेक दांडेकर, स्थानिक नगरसेवक भारती पालकर, धनंजय दुर्गे, मुख्याधिकारी डॉ. पंकज पाटील, नगर परिषद अभियंता मनीष गायकवाड, भानुदास पालकर, सोमनाथ पालकर, प्रदीप वायकर, ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष मोरेश्वर शहासने यांच्यासह अनेक ज्येष्ठ नागरिक आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
नगर परिषद फंडातून सुमारे सहा लाख दोन हजार 265 रुपये खर्च करून हे बांधकाम करण्यात येणार आहे, अशी माहिती नगराध्यक्ष सुवर्णा जोशी यांनी दिली. आम्हा ज्येष्ठ नागरिक संघटनेला या माध्यमातून हक्काचं कार्यालय मिळणार आहे, त्यामधून आम्ही आमच्या संघटनेचं कामकाज करू, असे मत अध्यक्ष मोरेश्वर शहासने यांनी या वेळी व्यक्त केले.