चिरनेर : प्रतिनिधी
उरण तालुक्यातील चिरनेर येथे जंगल सत्याग्रहाचा 91वा स्मृतिदिन शनिवारी (दि. 25) कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साधेपणाने होणार आहे. 1930च्या जंगल सत्याग्रहातील हुतात्म्यांच्या स्मृती चिरंतन राहाव्यात या हेतूने चिरनेर येथे दरवर्षी 25 सप्टेंबर रोजी अभिवादन करण्यात येते. चिरनेर ग्रामपंचायत प्रशासन, उरण पंचायत समिती, रायगड जिल्हा परिषद आणि नवी मुंबई पोलीस यांच्या संयुक्त विद्यमाने या शासकीय अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते असते, परंतु या वर्षी हुतात्मा स्मृतिदिन कार्यक्रमावर कोरोनाचे सावट आहे. चिरनेर सत्याग्रहात धाकू गवत्या फोफेरकर, नाग्या महादू कातकरी, रघुनाथ मोरेश्वर न्हावी, रामा बामा कोळी, परशुराम रामा पाटील, हसुराम बुधाजी घरत, आनंदा माया पाटील, आलू बेंबट्या म्हात्रे या शूरवीरांना हौतात्म्य आले होते.
Check Also
पिक्चर सुपर हिट; पुष्पा 2चे यश काही वेगळेच
सामाजिक, सांस्कृतिक वातावरण असे आहे की तुम्ही पुष्पा2च्या जाळ्यात सापडला आहात अथवा वावरताहात…लोकप्रियतेची जणू अक्राळविक्राळ …