Breaking News

खांदा कॉलनीतील रक्तदान शिबिराला प्रतिसाद

पनवेल : रामप्रहर वृत्त

भारत विकास परिषदेच्या वतीने खांदा कॉलनीमध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. खांदा कॉलनीतील रोटरी क्लब, नवीन पनवेलच्या रक्तपेढीमधे हे शिबिर झाले.  या शिबिराचे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये महिलांनी मोठ्या प्रमाणावर सहभाग घेऊन रक्तदान केले.

सध्या कोविडच्या संकटामुळे सर्वत्र रक्ताची मोठ्या प्रमाणावर आवश्यक्तता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर भारत विकास परिषदेने सभासदांना रक्तदानासाठी आवाहन केले. महिला दिनाचे औचित्य साधत महिलांनीही रक्तदान करण्यात पुढाकार घेतला.

या वेळी रोटरी क्लबच्या सभागृहात परिषदेची वार्षिक सर्वसाधारण सभा झाली. त्यामध्ये पनवेलच्या नवीन कार्यकारिणीची निवड करण्यात आली. गिरीश समुद्र अध्यक्ष, नितीन कानिटकर सचीव व शेखर बर्वे यांची खजिनदार म्हणून एकमताने निवड करण्यात आली.

भारत विकास परिषदेच्या वतीने अ‍ॅनामियामुक्त भारत हे अभियान सुरू आहे. 8 नोव्हेंबर रोजी 45 महिलांची हिमोग्लोबीन चाचणी करण्यात आली. त्यातील 22 महिलांनी रक्तदान केले होते. त्यानंतर महिला दिनाचे औचित्य साधून महिलांनी पुढाकार घेऊन रक्तदान करण्याचा संकल्प करण्यात आला होता. त्याची पूर्तता आज झाली आहे.

-डॉ. कीर्ती समुद्र,  भारत विकास परिषद, पनवेल

Check Also

उलवे पोलीस ठाण्याचे शानदार उद्घाटन

परिसरातील नागरिकांना न्याय मिळेल -आमदार महेश बालदी उलवे नोड ः रामप्रहर वृत्त आमदार महेश बालदी …

Leave a Reply