दुबई : वृत्तसंस्था
आगामी वनडे वर्ल्डकपमध्ये भारतीय संघाच्या सुरक्षेविषयी बीसीसीआयने आयसीसीच्या बैठकीत चिंता व्यक्त केली. त्यावर सुरक्षा वाढविण्याची गरज पडली, तर यावर संबंधित संस्थांबरोबर चर्चा करण्यात येईल, अशी हमी ‘आयसीसी’ने दिली आहे. पुलवामा हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर, बीसीसीआयच्या कार्यकारी समितीचे प्रमुख राहुल जोहरी यांनी आयसीसीच्या बैठकीमध्ये सुरक्षेची बाब उपस्थित केली होती.
भारतीय संघ, अन्य अधिकारी आणि भारतीय चाहत्यांच्या सुरक्षेविषयी त्यांनी चिंता व्यक्त केल्याचे बीसीसीआयच्या एका अधिकार्याने सांगितले. त्यावर, सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य असून, गरज पडली, तर हा मुद्दा ब्रिटनमधील सुरक्षा यंत्रणांबरोबर चर्चिला जाईल, अशी हमी आयसीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डेव्हिड रिचर्डसन यांनी दिली, तसेच इंग्लंड क्रिकेट बोर्डाचे प्रमुख कार्यकारी टॉम हॅरिसन यांनीही त्यांना दुजोरा दिला आहे.