नवी दिल्ली ः भारतीय जनता पक्षाने पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीसाठी आपल्या उमेदवारांच्या याद्या जाहीर केल्यात आहेत. यात पश्चिम बंगालमध्ये निवडणूक लढणार्या 65 उमेदवारांची तिसर्या व चौथ्या यादीचा समावेश असून, भाजपचे राष्ट्रीय महासचिव अरुण सिंह यांनी केंद्रीय मंत्री बाबूल सुप्रियो हे टॉलिगंज येथून लढणार असल्याची घोषणा केली. तामिळनाडूत भाजप 20 जागांवर निवडणूक लढवणार आहे. एनडीएचा घटक पक्ष म्हणून भाजप या ठिकाणी आयएडीएमकेसोबत मिळून निवडणुकीच्या मैदानात असेल. यापैकी रविवारी 17 उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आली. केरळमध्ये भाजप 115 जागांवर निवडणूक लढवणार आहे. याव्यतिरिक्त भाजपकडून आसाम आणि पुद्दुचेरीमधील उमेदवारांच्या नावांचीही घोषणा करण्यात आली आहे.
Check Also
बॉबी @५३ वर्षे; आजही तारुण्यात असलेला प्रेमपट
चित्रपट रसिकांच्या पिढ्या ओलांडल्या, बदलल्या. चित्रपट पाहण्याच्या पध्दतीत बदल होत गेले, रेडिओ ते यू ट्यूब …
RamPrahar – The Panvel Daily Paper