पनवेल : रामप्रहर वृत्त
महाआवास अभियानांतर्गत पनवेल पंचायत समितीमध्ये डेमो हाऊस बांधण्यात येणार आहे. या डेमो हाऊसच्या कामाच्या भुमीपूजन सोहळ्याचे बुधवारी आयोजन करण्यात आले होते. त्यानुसार पनवेल पंचायत समितीच्या सभापती देवकीबाई कातकरी यांच्या हस्ते या डेमो हाऊसच्या कामाचे भुमीपूजन करण्यात आले. महाआवास अभियान हे 11 नोव्हेंबर 2020 ते 31 मार्च 2021 पर्यंत सुरू आहे. त्याअंतर्गत प्रत्येक तालुक्याला डेमो हाऊस बांधण्यासाठी निधी मंजूर करून देण्यात आला आहे. त्यानुसार पंचायत समिती पनवेल, केंद्र व राज्य पुरस्कृत घरकुल योजना आणि महाआवास योजनेंतर्गत पनवेल पंचायत समितीमध्ये डेमो हाऊस बांधण्यात येणार आहे. या डेमोहाऊसच्या कामाच्या भूमीपूजन सोहळ्याला पनवेल पंचायत समिती सदस्या रत्नप्रभा घरत, सदस्य भुपेंद्र पाटील, मोहिते मॅडम, उप अभियंता कुलकर्णी, शाखा अभियंता संदेश पाटील, घरकुल योजनेचे मंगेश चंदने, विस्तार अधिकारी यू. डी. पाटील तसेच सर्व पंचायत समिती अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.