Breaking News

महिला सक्षमीकरणासंदर्भात मार्गदर्शन; पं. स. सदस्या रत्नप्रभा घरत यांची प्रमुख उपस्थिती

पनवेल : रामप्रहर वृत्त

पनवेल पंचायत समितीच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणाकरीता अनेक उपक्रम राबवून त्यांना उपजीविकेचे साधन उपलब्ध करून देण्याचे काम करण्यात येत आहे. त्याअंतर्गत महिला सक्षमीकरणासंदर्भात मार्गदर्शन करण्याकरीता शिवाजीनगर येथे पनवेल पंचायत समिती सदस्या रत्नप्रभा घरत यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी पंचायत समितीचे अधिकारी किशोर बोरडे यांनी महिलांना मार्गदर्शन केले. पनवेल पंचायत समितीच्या माध्यामतून शिवाजीनगर येथे महिला सक्षमीकरणाकरीता आयोजित बैटकीमध्ये महिलांना मार्गदर्शन करून बचत गट स्थापन करण्यात आले. यामध्ये शिवाजीनगर येथे पाच, तर मोरावे येथे दोन बचत गट तयार करून त्यांची ऑनलाइन नोंदणी करण्यात आली. तसेच या वेळी शिलाई मशीन, पापड बनविण्याची मशीन यांच्यामार्फत कशाप्रकारे लघु उद्योग सुरू करू शकतात, या संदर्भात महिलांना मार्गदर्शन करण्यात आले. या बैठकीत बचत गट अध्यक्षा चित्रलेखा पाटील, नंदा ठाकूर, मनिषा घरत, आशा म्हात्रे, अनिता ठाकूर, रजनी ठाकूर, सुरेखा ठाकूर, भागिरथी मोकल, मोहिनी पाटील आदी महिला उपस्थित होत्या.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply